
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरुद्ध केलेली विधाने द्वेषपूर्ण भाषणाच्या (हेट स्पीचच्या) कक्षेत येतात, असे मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने स्पष्ट केले.
🚨 HATE SPEECH EXPOSED
🧑⚖️ Madras High Court:
🔴 Udhayanidhi Stalin’s remarks against Sanatan Dharma amount to hate speech.😔 The Court observed it is tragic that:
❌ No case is filed against the hate-speaker⚖️ But action is taken against those who question it
🔥 Words like… https://t.co/8vRRYUh1h3 pic.twitter.com/vBFzGKlGhK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 21, 2026
उच्च न्यायालयाने म्हटले की,
दुःखाची गोष्ट अशी आहे की, द्वेषपूर्ण भाषण करणार्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदवला नाही, तर त्यावर प्रतिक्रिया देणार्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. आजच्या परिस्थितीत द्वेषपूर्ण भाषण करणारे वाचतात आणि प्रश्न विचारणार्यांना कायद्याचा सामना करावा लागतो. सनातन संपवण्यासारख्या शब्दांचा अर्थ केवळ विरोध नाही, तर ते मानणार्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे आहे, जे द्वेषपूर्ण भाषणाच्या श्रेणीत येते. स्टॅलिन यांचे हे विधान नरसंहार किंवा सांस्कृतिक नरसंहार यांचे संकेत देते. तमिळ शब्द ‘सनातना ओझिप्पू’ या शब्दाचा अर्थ केवळ विरोध नाही, तर पूर्णपणे नष्ट करणे, असा आहे.
भाजपच्या नेत्याविरुद्धचा गुन्हा रहित
वर्ष २०२३ मध्ये उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया यांच्याशी करत ‘तो नष्ट केला पाहिजे’, असे म्हटले होते. भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी स्टॅलिन यांच्या भाषणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केला होता. मालवीय यांनी प्रश्न उपस्थित केला की, हे विधान देशातील ८० टक्के सनातन धर्म मानणार्यांविरुद्ध आहे का ?’
भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी काय म्हटले होते ?, ट्विटमध्ये →
|
यावरून स्टॅलिन यांच्या द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड जनता पक्ष) पक्षाच्या एका नेत्याने उलट मालवीय यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. मालवीय यांनी स्टॅलिन यांच्या विधानाचा विपर्यास केला, असा आरोप करण्यात आला. याविरोधात मालवीय यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. आता मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने आता गुन्हा रहित केला आहे. न्यायालयाने सांगितले की, मालवीय यांनी स्टॅलिन यांच्या विधानावर केवळ प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अशा प्रतिक्रियेवर खटला चालवणे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल.
उदयनिधी यांना सर्वोच्च न्यायालयानेही फटकारले होते !
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ४ मार्चला उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, स्टॅलिन यांनी अधिकारांचा गैरवापर केला आहे. स्टॅलिन हे सामान्य माणूस नाहीत. त्यांनी विधानाच्या परिणामांचा विचार करायला हवा होता.
संपादकीय भूमिकान्यायालयाने या गुन्ह्यासाठी उदयनिधी यांना जन्मठेपेचीच शिक्षा ठोठावली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! |
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !