श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी मंचकी निद्रेस दिनांक १७ सप्टेंबरपासून ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात प्रारंभ झाला. सायंकाळी नैवेद्य, धुपारती झाल्यानंतर मानकरी पुजार्‍यांनी आरती करून देवीची दृष्ट काढली. या वेळी देवीला जेजुरीच्या खंडोबा मंदिरातून आलेला बेलभंडारा लावून मुख्य मूर्ती सिंहासनावरून हलवून सिंह गाभार्‍यातील शेजघरात चांदिच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात आली. या वेळी देवीचे भोपे पुजारी, पाळीकर, उपाध्ये पुजारी, मंदिराचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.