किरीट सोमय्यांना क्षमा मागावी लागेल ! – अनिल परब, माजी परिवहनमंत्री

भाजपचे खासदार किरीट सोमैय्या यांनी माझ्यावरती राजकीय द्वेषापोटी आरोप केले होते. आता किरीट सोमय्यांना एकतर क्षमा मागावी लागेल किंवा १०० कोटी रुपये मला द्यावे लागतील.

कोरोना महामारीच्‍या काळात मुलुंड कोविड केंद्रात १०० कोटींचा घोटाळा !

उद्धव ठाकरे यांच्‍या नेत्‍याने १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे’, असा दावा करून ‘या घोटाळ्‍याची चौकशी करण्‍यात यावी’, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्‍या यांनी ट्‍विटरद्वारे ८ ऑगस्‍ट या दिवशी केली आहे.

काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीच्‍या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्‍याकडे !

इंडिया’च्‍या बैठकीच्‍या आयोजनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ६ ऑगस्‍ट या दिवशी नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. याविषयी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आमच्‍यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार महत्त्वाचे नेते आहेत.

चित्रीकरणातील कृती प्रशिक्षणाचा भाग नाही ! – एन्.सी.सी.

या घटनेच्‍या तीव्र प्रतिक्रिया ४ ऑगस्‍टला ठाणे येथे उमटल्‍या. राष्‍ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे या राजकीय पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले.

‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणण्‍यास विरोध करणारे आमदार अबु आझमी यांचे सदस्‍यत्‍व त्‍वरित रहित करा ! – सकल हिंदू समाजाचे निवेदन

‘वन्‍दे मातरम्’ या मंत्राचा जयघोष करत अनेक क्रांतीकारकांनी भारताच्‍या स्‍वातंत्र्य संग्रामात सर्वस्‍वाचे बलीदान दिले. असे असतांना महाराष्‍ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विधानसभेत ‘जगात कुणापुढेही मस्‍तक झुकवण्‍यास इस्‍लाम अनुमती देत नाही.

ईडीकडून भागीदार सुजित पाटकर यांच्‍यासह एका आधुनिक वैद्याला अटक !

कोविड केंद्र गैरव्‍यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने लाईफ लाईन मॅनेजमेंट आस्‍थापनाचे भागीदार सुजित पाटकर यांच्‍यासह एका आधुनिक वैद्य किशोर बिसुरे यांना अटक केली.

अविश्‍वास ठराव प्रविष्‍ट केल्‍यानंतर उपसभापतींना पदावर बसण्‍याचा नैतिक अधिकार नाही ! – अनिल परब, आमदार, ठाकरे गट

विधान परिषदेच्‍या उपसभापती म्‍हणून डॉ. नीलम गोर्‍हे काम पहात आहेत. त्‍यांनी स्‍वत:हून पक्षाचे सदस्‍यत्‍व सोडलेले आहे. १० व्‍या परिशिष्‍टातील कायद्याच्‍या २ ‘अ’ मध्‍ये अपात्रतेची तरतूद आहे. त्‍याअंतर्गत आम्‍ही त्‍यांच्‍या विरोधात अपात्रतेची याचिका प्रविष्‍ट केली आहे.

प्राथमिक अपेक्षा पूर्ण करण्‍यातच कलंकित सरकार अपयशी ठरले आहे ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद

चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्‍कार घातला आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १६ जुलै या दिवशी विधानभवनात आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषदेत केला.

पन्‍हाळगड-पावनखिंड मार्गावर शिवभक्‍तांसाठी सुसज्‍ज निवास व्‍यवस्‍था उभारणार ! – डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, शिवसेना

शिवभक्‍तांची ठिकठिकाणी रहाण्‍याच्‍या सुसज्‍ज व्‍यवस्‍थेसह विकास आराखडा तातडीने मार्गी लावला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

… तर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊ शकते ! – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

कोणता पक्ष ‘शिवसेना’ याविषयी ३१ जुलै या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर निर्णय झाला नाही, तर या निवडणुकींसाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांना प्रतिकात्मक पक्षाचे नाव अन् चिन्ह द्यावे लागेल.