कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने कलियुगात कल्याण होईल ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

ज्या कुळात आपला जन्म झाला आहे, त्या कुलदेवतेचे नामस्मरण करा. ती आपल्या प्रारब्धाशी संबंधित देवता आहे. आपली साधना वाढल्यावर आपल्याला जीवनात सद्गुरु भेटतील. नामस्मरण केल्यास जीवनाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

शिवाची उपासना भावपूर्ण अन् शास्त्रोक्त पद्धतीने शिकवणारे सनातनचे ग्रंथ !

संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथे विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आणि अध्यात्मप्रसार !

संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने ३ मार्च या दिवशी पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सात्त्विक उत्पादने, तसेच शास्त्रोक्त माहिती असलेल्या ग्रंथांचे पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी कक्ष लावण्यात आले होते.

सनातन संस्थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यक्तीमत्त्व विकासासाठी अध्यात्म’ आदी विषयांवरील प्रवचने, अध्यात्माचे अभ्यासवर्ग, साधना सत्संग, बालसंस्कारवर्ग आदी माध्यमांतून संस्था समाजाभिमुख कार्य करत आहे.

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

विद्यार्थी-साधकांची प्रकृती, आवड, कौशल्य, सेवा शिकण्याची क्षमता आणि घरी गेल्यानंतर ते सेवेसाठी देऊ शकणारा वेळ या घटकांचा विचार करून त्यांना सेवा शिकवण्यात येतील. या सेवा शिकण्यासाठी त्यांना जेवढे दिवस आश्रमात रहाणे शक्य आहे, तेवढे दिवस ते राहू शकतात.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची कारागृहातून सुटका करण्याची मागणी !

या आंदोलनात श्री योग वेदांत सेवा समितीचे मुंबईतील विविध भागांतील एकूण ३५० हून अधिक साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक या वेळी उपस्थित होते. उ.बा.ठा. गटाचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हेही या वेळी उपस्थित होते.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे शिवजयंतीच्या उत्सवात सनातन संस्थेचा सहभाग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘विश्व सनातन सेने’चे तिरहुत विभागाचे श्री. अनिल कुमार यांनी शिवजयंती उत्सव आयोजित केला होता. या उत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘हैद्राबाद पुस्तक मेळ्या’तील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुस्तक मेळ्यातील अन्य विक्रेत्यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनावरील साहित्य खरेदी केले. त्यांनी संस्थेच्या आकर्षक प्रदर्शनाचे पुष्कळ कौतुक केले. ‘‘संपूर्ण मेळ्यात असे प्रदर्शन नाही’’, असे ते म्हणाले.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने सनातन संस्थेचे कार्य अत्यंत प्रभावी ! – अखिल भारतीय धर्मसंघ पिठाधीश्वर श्री श्री १००८ श्री शंकर देव चैतन्य ब्रह्मचारी महाराज

सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन पाहून त्यांनी सांगितले, ‘‘प्रदर्शनाला भेट देऊन आमचे माघमेळ्याला येण्याचे सार्थक झाले, असे आम्हाला वाटत आहे.’’