
बापूसाहेब साठये यांना श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) एकदा म्हणाले, ‘बापूसाहेब, तुमच्या आयुष्यातील प्रमुख घटना कोणत्या ते सांगा.’ यावर बापूसाहेबांनी म्हातारपणापर्यंतच्या सार्या ठळक घटना श्रीमहाराजांना ऐकवल्या. त्यांचे सांगणे संपल्यावर श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ‘मी तुम्हाला भेटलो, या घटनेला इतक्या सर्व लहानमोठ्या घटनांमध्ये कुठेच स्थान नाही का ?’ तेव्हा कुठे बापूसाहेबांना स्वतःची चूक लक्षात आली.
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)