|

यवतमाळ – लोहारा औद्योगिक परिसरामध्ये असलेल्या रेमंड आस्थापनामधील कर्मचार्यांना गेल्या १६ महिन्यांपासून वेतनवाढ न मिळाल्याने १ सहस्रांहून अधिक कामगारांनी २१ जुलैपासून कामबंद आंदोलन चालू केले आहे, त्यामुळे कामगारांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार श्री. संजय देशमुख यांनी ३० जुलै या दिवशी लोकसभेत केली.
ते म्हणाले की, आस्थापनासमवेत ३१ मार्च २०२० या दिवशी झालेल्या कराराची मुदत संपली आहे. नियमानुसार १ एप्रिल २०२४ पासून नवीन करारामध्ये वेतनवाढ होणे आवश्यक होते; पण ती अद्याप झाली नाही. अतिशय अल्प वेतनात कसे जगायचे ? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
संपादकीय : फोल आंदोलन
पाकिस्तानातील अंतर्गत अस्थिरता
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान