निधन वार्ता

येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. अक्षरा दिनेश बाबते यांच्या आई तसेच श्री. दिनेश बाबते यांच्या सासूबाई श्रीमती आशा मुरलीधरराव भेडसूरकर (वय ७७ वर्षे) यांचे परभणी येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले.

निधन वार्ता

येथील साधिका सौ. चैताली झोडे, अमरावती येथील श्रीमती रोहिणी नांदुरकर, नगर येथील सौ. मानसी मेंढुलकर यांचे वर्धा येथे रहाणारे वडील भालचंद्र गळगटे (वय ७१ वर्षे) यांचे १६ डिसेंबरला हृदयविकाराने निधन झाले.

अडचणींकडे पहायचा दृष्टीकोन !

पूर्णतेच्या मार्गाने ज्याला वाटचाल करायची आहे, त्याला अडचणी येणारच. त्याने त्याविषयी कधी तक्रार करू नये; कारण प्रत्येक अडचण ही नवीन प्रगतीची सुवर्णसंधी असते.

कोटी कोटी प्रणाम !

• डिचोली येथील श्री शांतादुर्गादेवीचा ‘नवा सोमवार’ उत्सव !
• कोरगाव (पेडणे) येथील श्री भूमिकादेवीचा आज जत्रोत्सव !
• कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज यांची आज पुण्यतिथी !

‘समर्थांचे महानिर्वाण’ पुस्तकाचे प्रकाशन

या पुण्यतिथी उत्सवाचे औचित्य साधून परमहंस भालचंद्र महाराज यांच्या अखेरच्या काळातील काही आठवणी, दृष्टांत आणि समाधी सोहळा यांचा वृत्तांत असलेल्या कै. सुरेश सातपुते लिखित ‘समर्थांचे महानिर्वाण’ या पुस्तकाच्या द्वितिय आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.

आजचा वाढदिवस – चि. शौर्य ठमके

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा रोहा (जिल्हा रायगड) येथील चि. शौर्य संकेत ठमके याचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी (२०.१२.२०२०) या दिवशी पहिला वाढदिवस आहे.

कोटी कोटी प्रणाम !

• नगर येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढेआजी यांचा आज वाढदिवस
• सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा आज वाढदिवस
• आरोंदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरी भद्रकाली देवतांचा आज जत्रोत्सव !