भारतीय तांत्रिक कर्मचारी मालदीवमध्ये पोचले !

भारतीय तांत्रिक कर्मचार्‍यांची पहिली तुकडी मालदीवमध्ये पोचली आहे. हे कर्मचारी १० मार्च या दिवशी भारतात परतणार्‍या सैनिकांची जागा घेणार आहेत, अशी माहिती मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने दिल्याचे वृत्त आहे.

India Slams Pakistan In UN : आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या देशाकडे आम्ही लक्ष देत नाही ! – अनुपमा सिंह, संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या सचिव

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागात भारताने पाकिस्तानला काश्मीर प्रश्‍न उपस्थित केल्यावरून सुनावले.

NewZealand Reverses Tobacco Ban : न्यूझीलंडमधील नवनिर्वाचित सरकारने तंबाखूवरील बंदी उठवली !

तंबाखूमुळे होणार्‍या मृत्यूंविषयी तज्ञांनी असा निर्णय न घेण्याविषयी सरकारला चेतावणी दिली होती; मात्र असे असतांनाही सरकारने  तंबाखूच्या विक्रीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली. न्यूझीलंड सरकारच्या या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका झाली आहे.

Geert Wilders Death Threat : गीर्ट विल्डर्स यांच्या हत्येसाठी फतवा काढणार्‍या पाकिस्तानच्या २ नागरिकांवर  नेदरलँड्समध्ये आरोप निश्‍चित !

२ पाकिस्तान्यांपैकी एक ५५ वर्षीय मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) आहे आणि दुसरा २९ वर्षीय राजकीय नेता आहे.

इंग्लंडच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या विरोधात इस्लामद्वेषाचा दावा !

इस्लामद्वेषासंदर्भात खासदार ली अँडरसन आणि सुएला ब्रेव्हरमन यांच्या टिप्पण्यांनंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांना आता त्यांच्या पक्षाच्या बचावासाठी पुढे यावे लागले आहे.

अफगाणिस्तान पाकच्या बंदराऐवजी इराणमधील बंदरांतून करू लागला व्यापार !

भारताने इराणमध्ये बांधलेल्या ‘चाबहार’ आणि इराणचा ‘बंदर अब्बास’ या बंदरांचा वापर करून अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार  जगात आयात आणि निर्यात करत आहे.

Nepali Youths In Russian Army : रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी तरुणांना परत आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – नेपाळचे परराष्ट्रमंत्री

‘रशियातील सर्व नेपाळी तरुणांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार’, असे आश्‍वासन सौद यांनी रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी नागरिकांच्या कुटुंबियांशी संवाद साधतांना केले.

UK MP Targeted India : (म्हणे) ‘भारतीय हस्तक शिखांना लक्ष्य करत आहेत !’ – महिला शीख खासदार प्रीत कौर गिल, ब्रिटन

भारतावर आरोप करणारे गिल यांच्यासारखी मंडळी खलिस्तानी करत असलेल्या भारतविरोधी कृत्यांविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

Saudi Arabia Bans Iftar : सौदी अरेबियात मशिदींमध्ये इफ्तारच्या आयोजनावर बंदी, तसेच अजानच्या आवाजावरही नियंत्रण !

जर इस्लामचे माहेरघर असलेला सौदी अरेबिया मशिदींच्या संदर्भात असे कठोर  निर्णय घेऊ शकतो, तर ‘धर्मनिरपेक्ष’ भारतात राष्ट्रविघातक कारवाया चालू असलेल्या बहुतांश मशिदींवर कारवाई करायला भारत सरकारला अडचण येऊ नये !

पाकमधील नियमित पूजा होत असलेल्या एकमेव मंदिराच्या शेजारी उभारले जात आहे नवे मंदिर !

ज्या बाबराने अयोध्येतील श्रीराममंदिर पाडले, त्याच्याच नावाचा कारागीर पाकमध्ये मंदिर बांधत आहे. या ‘बाबरा’त जरी तशी जिहादी वृत्ती नसली, तरी ‘बाबरा’ची विद्ध्वंसक हिंदुद्वेषी वृत्ती असलेले पाकमधील त्याचे वंशज या मंदिराला हानी पोचवणार नाहीत, हे कशावरून ?