भारतीय तांत्रिक कर्मचारी मालदीवमध्ये पोचले !

१० मार्चला परतणार्‍या सैनिकांची जागा घेणार !

माले (मालदीव) – भारतीय तांत्रिक कर्मचार्‍यांची पहिली तुकडी मालदीवमध्ये पोचली आहे. हे कर्मचारी १० मार्च या दिवशी भारतात परतणार्‍या सैनिकांची जागा घेणार आहेत, अशी माहिती मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने दिल्याचे वृत्त आहे.

वास्तविक, भारत आणि मालदीव यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार, भारतीय सैनिक १० मेपर्यंत भारतात परततील अन् मालदीव यांचे बचाव पथक (रेस्क्यू युनिट) भारतीय तांत्रिक कर्मचारी चालवतील. या कराराचा पहिला टप्पा १० मार्चपर्यंत पूर्ण होईल.

सौजन्य  GK Drishti

मालदीवमध्ये भारताचे ३ विमानतळ !

मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मालदीवमध्ये भारताचे तीन  विमानतळ आहेत. यांपैकी एकावर उपस्थित असलेले सैनिक १० मार्चपर्यंत भारतात परततील. यानंतर इतर दोन तळांवर उपस्थित असलेले भारतीय सैनिक १० मेपर्यंत भारतात परतणार आहेत.

मालदीवमध्ये जवळपास ८० भारतीय सैनिक तैनात !

मालदीवमध्ये जवळपास ८० भारतीय सैनिक तैनात असून ते दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान यांच्या हालचाली हाताळतात. मालदीवमधील भारतीय हेलिकॉप्टर आणि विमान तेथील लोकांना मानवतावादी साहाय्य अन् वैद्यकीय आपत्कालीन सेवा पुरवण्याचे कार्य करतात.