गोवा : चित्रपटनगरीसाठी श्री भगवती पठारावरील भूमी देण्यास लोलये येथील ग्रामस्थांचा विरोध

येथील पर्यावरण, वृक्ष-वेली, पक्षी, प्राणी आणि निसर्ग स्रोत यांवर या प्रकल्पाचा परिणाम होणार असून युवकांना रोजगार उपलब्ध न होता येथे अनैतिकता पसरेल अन् समाजविघातक गोष्टी होतील. त्यामुळे आम्ही चित्रपटनगरीला विरोध करणार आहोत.

गोवा : हणजुण आणि पेडणे समुद्रकिनार्‍यांवर होणारे ध्वनीप्रदूषण !

समुद्रकिनार्‍यांवर ध्वनीप्रदूषण करणार्‍या आस्थापनांना टाळे ठोकण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश ! प्रत्येक वर्षी न्यायालयाला का आदेश द्यावे लागतात ? पोलीस आणि प्रशासन निष्क्रीय आहे कि अधिकार्‍यांचे आस्थापनांशी साटेलोटे आहे ?

गोवा : अमली पदार्थ प्रकरणी नायजेरियाच्या नागरिकाला सशर्त जामीन संमत

अमली पदार्थांची प्रकरणे वाढत असतांना असा हलगर्जीपणा अपेक्षित नाही. अशाने अमली पदार्थ व्यावसायिकांना दिलासाच मिळणार ! रासायनिक अहवालाला होणार्‍या विलंबाची समस्या तात्काळ सोडवणे आवश्यक आहे !

गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील मद्यतस्करीचे मूळ काणकोण येथे !

काणकोण (गोवा) येथील लिगोरियो डिसोझा हा आंतरराज्य मद्यतस्करीमध्ये विदेशी मद्य पुरवणारा एकमेव पुरवठादार आहे. गुजरात न्यायालयाने लिगोरियो डिसोझा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

गोव्यातील इस्रायली पर्यटक मायदेशी परतत आहेत !

‘देश प्रथम, सुटी नंतर’, अशी इस्रायली पर्यटकांची भावना ! भारतियांनी यातून बोध घ्यावा ! असे राष्ट्रप्रेम किती भारतियांमध्ये आहे ?

विविध उपक्रम राबवून आणि कौशल्य विकास अभ्यासक्रमाची सुविधा देऊनही बंदीवानांमध्ये सुधारणा अल्प ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

कोलवाळ कारागृहात चिकन वाढण्यासारख्या क्षुल्लक कारणामुळे हल्लीच बंदीवानांमध्ये हाणामारी झाली होती. यात ३ बंदीवान घायाळ झाले होते.

गोव्यासह इतर राज्यांत १३५ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ आणण्याचा डाव फसला !

अमली पदार्थ तस्करी हा राष्ट्रविरोधी गुन्हा ठरवून त्याप्रमाणे त्यातील दोषींना शिक्षा होणे आवश्यक आहे; कारण शत्रूराष्ट्र पाकिस्तान आणि चीन हे अमली पदार्थांद्वारे देशाची युवा पिढी नष्ट करण्याचे षड्यंत्र रचत आहेत !

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मुदत संपण्यास १२ दिवस शिल्लक

गोवा खंडपिठाने सरकारला निर्देश देतांना म्हटले होते की, ‘म्हादई अभयारण्य क्षेत्र आणि आजूबाजूचा परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करावा’ आणि त्यासाठी तीन मासांची मुदत दिली होती.

गोव्यात खासगी क्रीडा विद्यापिठाचे स्वागत करू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

काही संस्थांनी यात रस दाखवला आहे. जर एखाद्या खासगी संस्थेने ५० सहस्र चौ.मी. भूमी दाखवल्यास त्या संस्थेला विद्यापीठ चालू करता येईल. क्रीडा क्षेत्र हे भवितव्य घडवण्याचे एक साधन म्हणून अनेक जण त्याचा स्वीकार करणार आहेत.

गोवा : कळंगुट पोलिसांची अनधिकृत दलालांवर कारवाई 

अनेक वेळा अनधिकृत दलालांवर कारवाई होऊनही हे प्रकार का थांबत नाहीत, याचा प्रशासनाने शोध घ्यावा ! पकडलेले दलाल दंड भरून सुटका झाल्यानंतर पुन्हा तोच प्रकार करत असावेत. यामुळे त्यांना धाक बसेल अशी शिक्षा केली पाहिजे !