कर्नाटकातील काँग्रेसचा हिंदुद्वेषी कारभार जाणा !

मंड्या (कर्नाटक) जिल्ह्यातील केरागोडू गावामध्ये हिंदूंनी १०८ फूट उंच खांबावर लावलेला श्री हनुमानाचे चित्र असलेला भगवा ध्वज कर्नाटक पोलिसांनी बलपूर्वक उतरवला. याला हिंदूंनी विरोध केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची स्थिती जाणा !

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी विजयपूर (कर्नाटक) येथील मध्यवर्ती कारागृहात पूजा करणार्‍या हिंदु बंदीवानांवर मुसलमान बंदीवानांकडून आक्रमण करण्यात आले. मुसलमान कारागृह अधीक्षकांनी यासाठी चिथावणी दिली होती.

हिंदुद्वेष्ट्या धर्मांध मुसलमानाला पुरस्कार देणारा हिंदुद्रोही द्रमुक !

तमिळनाडूचे द्रमुक सरकारचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी ‘अल्ट न्यूज’ या हिंदुद्वेष्ट्या वृत्तसंकेतस्थळाचा सहसंस्थापक महंमद जुबेर याला सरकारचा ‘सांप्रदायिक सद्भाव’ पुरस्कार घोषित केला आहे. भाजपने याला विरोध केला आहे.

हिंदु राष्ट्रासाठी किती हिंदू आणि नेते असा त्याग करणार ?

मी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे, अशी घोषणा भाग्यनगर (तेलंगाणा) येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी छत्तीसगडमध्ये बागेश्वर धामच्या कार्यक्रमात केली.

हिंदूंनो, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील वडोदरा येथे मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. ‘आज आमच्यासमोर येणार्‍या हिंदूंना ठार करणार. आम्ही २ ते ४ हिंदूंना कापणार’, अशा धमक्या ते देत होते.

मुसलमानांवर अत्याचार करणार्‍या चीनविषयी इस्लामी संघटना गप्प का ?

५७ इस्लामी देशांची संघटना ‘ओआयसी’ने ‘अयोध्येत ज्या ठिकाणी बाबरी मशीद पाडली गेली, त्याच ठिकाणी श्रीराममंदिराचे बांधकाम आणि त्यानंतर तेथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे ही चिंतेची गोष्ट आहे’, असे म्हटले आहे.

असे आवाहन का करावे लागते ?

मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी, असे आवाहन श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उत्खननानंतर महत्त्वाचे निष्कर्ष काढणारे पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी मुसलमानांना केले आहे.

आता रामराज्यासाठी कटीबद्ध व्हा !

अयोध्येत ५०० वर्षांनंतर भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाली आहे. आता रामभक्तांनी संघटित होऊन भारतात पुन्हा रामराज्याची स्थापना होण्यासाठी कटीबद्ध झाले पाहिजे.

ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

पनवेल रेल्वेस्थानकाच्या बाहेरील भागात हिंदूंना भगवे झेंडे लावण्यास धर्मांध मुसलमानांनी ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि ‘नारा ए तकबीर’च्या  (‘अल्लापेक्षा मोठे कुणी नाही’च्या) घोषणा देत विरोध केला. या वेळी पोलीस निष्क्रीय होते.

आता रामराज्य दूर नाही !

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांनंतर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले आहे. मंदिराच्या उभारणीसाठी ५ शतकांमध्ये लक्षावधी हिंदूंनी प्राणार्पण केले.