आतंकवाद्यांना धर्म असतो !
कांस (फ्रान्स) येथे महंमद पैगंबर यांचे नाव घेत आणि ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत एका आतंकवाद्याने पोलिसांवर चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात ३ पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतंकवादी घायाळ झाला.
कांस (फ्रान्स) येथे महंमद पैगंबर यांचे नाव घेत आणि ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत एका आतंकवाद्याने पोलिसांवर चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात ३ पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतंकवादी घायाळ झाला.
ग्रीसच्या सर्वाेच्च न्यायालयाने ‘हलाल’ पद्धतीने प्राण्यांची हत्या करण्यावर बंदी घातली आहे. आता ग्रीसमध्ये कोणत्याही प्राण्याची हत्या करण्यापूर्वी त्याला बेशुद्ध करावे लागणार आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर गेल्या २० वर्षांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पट वाढ झाली आहे.
जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केल्याच्या प्रकरणी जम्मू-काश्मीर प्रशासनाने कारागृह उपअधीक्षक फिरोज अहमद लोन आणि मुख्याध्यापक जावेद अहमद शाह या दोघांना नोकरीतून बडतर्फ केले आहे. या वर्षी २७ सरकारी कर्मचार्यांना या प्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहे.
चित्रपट निर्मात्या रोशनी अली दिवाळी आणि अन्य वेळी फटाके फोडण्यावर बंगालमध्ये बंदी घालण्यासाठी पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहेत.
१०० वर्षांपूर्वी मोहनदास गांधी यांच्या पक्षाच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाची घटना लिहिण्यात आली होती. आता त्यात पालट करण्यात येणार असून ‘मद्यपान न करणे’ या नियमात सवलत दिली जाऊ शकते.
खलिस्तानी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने जनमत संग्रहाची पहिली फेरी लंडन येथे आयोजित केली होती. यात शिखांना ‘पंजाब’ एक स्वतंत्र देश असला पाहिजे कि नाही ?’, यावर मतदान करायचे होते.
उत्तरप्रदेशातील महत्त्वाची ४६ रेल्वे स्थानके बाँबने उडवून देण्याची धमकी लष्कर-ए-तोयबाकडून देण्यात आली आहे. यानंतर राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
त्रिपुराच्या कैलाशहर भागातील महाकाली मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मूर्तीची आणि मंदिराची तोडफोड केली. ‘जमावाने येथील एका मशिदीला आग लावली’, या अफवेनंतर धर्मांधांनी ही तोडफोड केली.
‘मॅकडोनल्ड्स’, ‘बर्गर किंग’, ‘डॉमिनोज्’, ‘पिझ्झा हट’ ‘टॅको बेल‘, ‘चिपोटल’ आदी खाद्यपदार्थ विकणार्या आस्थापनांच्या खाद्यपदार्थांमध्ये रसायनांचा वापर केला जातो’, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका संशोधनातून समोर आला आहे, असे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.