बांगलादेशातील हिंदूंविषयी राहुल गांधी गप्प का ?
‘त्रिपुरामध्ये आमच्या मुसलमान बांधवांशी अमानुष व्यवहार केला जात आहे’, असे ट्वीट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्रिपुरामधील हिंसाचाराच्या प्रकरणी केले आहे.
‘त्रिपुरामध्ये आमच्या मुसलमान बांधवांशी अमानुष व्यवहार केला जात आहे’, असे ट्वीट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्रिपुरामधील हिंसाचाराच्या प्रकरणी केले आहे.
नवी देहलीमध्ये रोशन पाठक स्वतःच्या घरात पूजा करतांना घंटी आणि शंख वाजवत असल्याने शेजारी रहाणार्या दानीश याने झोपमोड होत असल्याचे सांगत विरोध केला आणि पाठक यांना ठार मारण्याची धमकी दिली.
राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये हिंदूंचे देवघर बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातून या संदर्भात आदेश देण्यात आला आहे.
चीनमध्ये आता मशिदींचे घुमट आणि मिनार हटवण्यात येत असून त्या ठिकाणी चिनी पद्धतीने रचना करण्यात येत आहे. ‘ही प्रतिके मध्यपूर्व आशियातील इस्लामीकरणाचा भाग वाटू नये; म्हणून असे करण्यात येत आहे’, असे सरकारने म्हटले आहे.
देशात काश्मीरमध्ये, देहलीतील सीमापुरी, उत्तरप्रदेशातील सहारनपूर आदी मुसलमानबहुल भागांमध्ये पाकने टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सामन्यामध्ये भारताला पराभूत केल्यानंतर फटाके फोडण्यात आले.
‘डाबर’ आस्थापनाने त्याचे उत्पादन ‘गोल्ड ब्लीच’ (चेहरा उजळण्यासाठीची पावडर) या उत्पादनासाठी प्रसारित केलेल्या विज्ञापनातून एक समलैंगिक जोडपे त्यांचा पहिला ‘करवा चौथ’ हे व्रत साजरे करतांना दाखवले आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतर आता तेथे शिल्लक राहिलेल्या शिखांना ‘अफगाणिस्तान सोडा किंवा इस्लामचा स्वीकार करा’, अशा धमक्या देण्यात आल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
प्रतिदिन सरासरी ६३२ हिंदू बांगलादेश सोडून दुसर्या देशांत आश्रय घेत आहेत. त्यामुळे वर्ष २०५० पर्यंत बांगलादेशात हिंदूच नसतील, असे मत ढाका विद्यापिठातील प्रा. डॉ. अबुल बरकत यांनी त्यांच्या पुस्तकात व्यक्त केले आहे.
बांगलादेशात कुराणाचा अवमान झाल्याचा आरोप करत धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्याच्या प्रकरणात अनेक हिंदू ठार झाले. इक्बाल हुसेन याने श्री दुर्गादेवी पूजा मंडपातील श्री हनुमानाच्या मूर्तीच्या पायाजवळ कुराण ठेवल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.
जगभरात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने ‘इंडोनेशिया मशीद परिषदे’ने हा निर्णय घेतला आहे.