पाकच्या उलट्या बोंबा जाणा !
भारतात अल्पसंख्यांक, विशेषतः मुसलमानांच्या विरोधातील हिंसा रोखली गेली पाहिजे. मुसलमानांचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण केले पाहिजे, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतात अल्पसंख्यांक, विशेषतः मुसलमानांच्या विरोधातील हिंसा रोखली गेली पाहिजे. मुसलमानांचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण केले पाहिजे, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
‘राजस्थानमध्ये शिक्षकांना स्थानांतर करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते’, हे राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समोर शिक्षकांनी मान्य केले.
जामनगर (गुजरात) येथील काँग्रेसचे अध्यक्ष दिभुगा जडेजा यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंदु सेनेने उभारलेल्या पंडित नथुराम गोडसे यांच्या पुतळ्याची तोडफोड केली.
थिरूवनंतपूरम् (केरळ) येथे रा. स्व. संघाचे २७ वर्षीय स्वयंसेवक संजीत यांची ४ अज्ञातांनी १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी हत्या केली. या हत्येसाठी भाजपने ‘सोशल डेमोक्रिटिक पार्टी ऑफ इंडिया’ या राजकीय पक्षाला उत्तरदायी ठरवले आहे.
केरळच्या शबरीमला मंदिरात मिळणारा ‘अरावणा पायसम’ हा पारंपरिक गोड प्रसाद बनवण्याचे कंत्राट मुसलमान व्यक्तीला देण्यात आले असून त्याला ‘अल् झहा’ असे अरबी नाव देऊन त्यावर ‘हलाल प्रमाणित’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
‘हिंदुत्व म्हणजे शीख किंवा मुसलमान यांना मारहाण करणे आहे. अखलाकची हत्या करणे हेही हिंदुत्व होते का ?’, असा प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात उपस्थित केला.
‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे सर्व जण ‘मुनि’ असू शकत नाहीत. आजकाल ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे काही जण संत नाहीत, तर राक्षस आहेत, असे विधान काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी केले.
धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणे, दंगली करणे आणि दलितांवर अत्याचार करणे, हे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही चालले आहे, ते हिंदुत्व नाही, असे विधान देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
पहाटेच्या अजानमुळे लोकांची झोपमोड होते. पहाटे साधू-संतांची चालू असलेली पूर्जा-अर्चा किंवा ध्यान साधनेतही व्यत्यय येतो, असे विधान भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले.
देशात ३३ लाखांहून अधिक बालके कुपोषित आहेत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक बालके तीव्र कुपोषित श्रेणीत येतात, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.