हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड करून मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना घडली आहे.
ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड करून मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना घडली आहे.
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीच्या समर्थनार्थ उत्तरप्रदेशमध्ये ‘श्रीरामचरितमानस’च्या काही प्रती जाळण्यात आल्या. या प्रकरणी १ मुसलमान आणि ४ ओबीसी यांना अटक करण्यात आली आहे.
बिहारच्या बसडीला गावामध्ये २७ जानेवारीला धर्मांध मुसलमानांनी मशिदीजवळ अंकित कुमार या तरुणाची क्रिकेटच्या वादावरून हत्या केली. या वेळी त्याचे ३ मित्र घायाळ झाले.
मध्यप्रदेशातील दिवेल गावामध्ये हनुमान मंदिरावरील भोंग्याचा आवाज न्यून करण्यास नकार दिल्यानंतर मुसलमानांनी मंदिराच्या पुजार्याला घरात घुसून मारहाण केली. पुजार्यांनी मशिदींवरील भोंग्यांचा आवाज आधी न्यून करण्याची मागणी केली होती.
‘हिंदु राष्ट्र बनवणारे किती आले आणि किती गेले. आमच्या देशाला हिंदु राष्ट्र बनवले जाऊ शकत नाही’, असे विधान बरेली (उत्तरप्रदेश) येथील मौलाना तौकीर रझा यांनी धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या हिंदु राष्ट्र बनवण्याच्या विधानावर केले.
ख्रिस्त्यांचे माजी सर्वोच्च धर्मगुरु पोप बेनेडिक्ट १६ वे यांच्या निधनानंतर त्यांचे ‘ख्रिस्ती धर्म काय आहे ?’, हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. यात त्यांनी पाद्री बनण्याचे प्रशिक्षण देणार्या शिबिरामध्ये समलैंगिक क्लब चालण्यात येत असल्याचा दावा केला आहे.
बांगलादेशातील नेत्रकोना येथील पूरबाधला मार्केटमधील हिंदूंच्या मंदिरावर मुसलमानांनी आक्रमण करून तेथील सर्व मूर्ती तोडल्या.
मध्यप्रदेशातील सरकारी शाळांमध्ये श्रीमद़्भगवद़्गीता, रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषदे शिकवली जाणार आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, या ग्रंथांमध्ये मानवाला परिपूर्ण बनवण्याची क्षमता आहे.
महंमद गझनी याने सोमनाथ मंदिर पाडून कोणतीही चूक केली नाही. गझनीने तेथील अपकृत्ये थांबवली, असे संतापजनक विधान अ.भा. इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना रशिदी यांनी केले.
रामचरितमानसमध्ये सर्व काही कचरा आहे. हाच धर्म आहे का ? रामचरितमानसवर बंदी घातली पाहिजे, अशी संतापजनक मागणी समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केली आहे.