अशा आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा करा !

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने अल् कायदाच्या मिनाज आणि मसरुद्दिन या दोघा आतंकवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. हे आतंकवादी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करणार होते.

असा कायदा संपूर्ण देशासाठी हवा !

उत्तरप्रदेश शासनाकडून लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्यात येत आहे. या कायद्यामुळे २ पेक्षा अधिक मुले असणार्‍यांना सरकारी अनुदान किंवा योजना यांचा लाभ मिळणार नाही. तसेच सरकारी नोकरीसाठी ते अर्जही करू शकणार नाहीत.

केंद्र सरकारने लवकरात लवकर समान नागरी कायदा करावा !

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे आता देशाला खर्‍या अर्थाने समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. याविषयी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे मत देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना मांडले.

अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

‘श्री सत्यनारायण कथा आणि भागवत कथा अवैज्ञानिक आहेत’, असे विधान केल्याच्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे गुजरातमधील अध्यक्ष गोपाल इटालिया यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अशांना कारागृहात डांबले पाहिजे !

देहली बार कौन्सिलने कडकडडूमा न्यायालयात कार्यरत असलेला अधिवक्ता इक्बाल मलिक याचा परवाना तात्पुरता रहित केला आहे. इक्बालवर त्याच्या चेंबरचा वापर धर्मांतर आणि विवाह करून देण्यासाठी केल्याचा आरोप आहे.

अशांना कठोर शिक्षा व्हावी !

केरळ विधानसभेमध्ये वर्ष २०१५ मध्ये एल्.डी.एफ्.च्या आमदारांनी केलेल्या तोडफोडीविषयीचा खटला मागे घेण्याचा आदेश देण्यास सर्वाेच्च न्यायालयाने नकार देत ‘तुम्ही (आमदारांनी) जनतेच्या संपत्तीचा नाश केला आहे. यातून तुम्ही जनतेला काय संदेश देऊ इच्छित होता ?’ असा प्रश्नही विचारला.

पाकच्या उलट्या बोंबा जाणा !

मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.

लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी समान नागरी कायदा करा !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून १५० मुसलमान नेत्यांशी ४ जुलै या दिवशी चर्चा केली. ‘केवळ २ मुले असणार्‍या कुटुंबालाच सरकारी योजनांचा लाभ देणार’, याविषयी त्यांनी चर्चेमध्ये सांगितले.

अशा दैनिकांवर भारतात बंदी घाला !

अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या दैनिकाने वार्ताहर हवा असल्याचे एक विज्ञापन प्रसिद्ध करतांना त्यात ‘भारतविरोधी आणि मोदीविरोधी’ विचारसरणीची अर्हता ठेवली आहे. देहली येथून काम करावे लागणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

भारत आक्रमक कधी होणार ?

जम्मूमध्ये विविध ठिकाणी पाकचे ड्रोन आढळून आल्यानंतर आता पाकमधील थेट भारतीय उच्चायुक्तालयाच्या परिसरात ड्रोन आढळून आले. भारताकडून या घटनेचा पाककडे तीव्र शब्दांत निषेध नोंदवूनही पाकने त्याची साधी दखलही घेतलेली नाही.