वाहनपरवान्यासाठी पडताळणी न करता १०० रुपयांत आरोग्य योग्यता प्रमाणपत्र !

स्वार्थासाठी बोगस आरोग्य योग्यता प्रमाणपत्र देऊन जनतेच्या जिवाशी खेळणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे यांच्यावर कठोर कारवाई केली, तरच याला आळा बसेल. निःस्वार्थी, प्रामाणिक पिढी निर्माण झाल्यास भ्रष्टाचाराला वाव रहाणार नाही.

खोट्या गुन्ह्यात अडकवून जामिनासाठी ५० लाख रुपयांची मागणी करणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍यासह तिघांविरुद्ध गुन्हा !

कुंपणच शेत खायला लागले, तर दाद कुणाकडे मागायची अशी सर्वसामान्यांची स्थिती झाली आहे ! कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !

तक्रारदाराच्या नातेवाइकाला अटक न करण्यासाठी लाच मागणारा धर्मांध पोलीस कर्मचारी आसिफ नसरूद्दीन सिराजभाई अटकेत !

तक्रारदारास त्याच्या आत्याला अटक न करणार्‍यासाठी शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आसिफ नसरूद्दीन सिराजभाई आणि पोलीस पाटील जगदीश सपकाळ यांना दीड सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली.

भ्रष्ट आणि अत्याचारी पोलिसांना न ओळखणारे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे सहकारी पोलीस हेही अप्रत्यक्षरित्या भ्रष्टच !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

नागपूर महापालिकेत ५ कोटी ४७ लाख रुपयांची २५९ बनावट कंत्राटे चौकशी समितीने उघडकीस आणली !

महापालिकेच्या स्टेशनरी साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचे प्रकरण

पिंपरी-चिंचवडचे (पुणे) माजी उपमहापौर आणि भाजपचे घोळवे यांना लाच प्रकरणी अटक !

असे भ्रष्ट लोकप्रतिनिधी जनतेसमोर काय आदर्श ठेवणार ? घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळेच भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !

संजय राऊत यांच्या निकटवर्तियाला ईडीकडून अटक !

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील पत्रा चाळ भूमी घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे.

पोलिसांच्या स्थानांतराची सूची मला अनिल परब द्यायचे ! – अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

‘जे नियमात बसत असेल, तेच करा नाही तर नाव बाहेर काढा’, असेही तत्कालीन सचिवांना सांगितले होते’, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी जबाबात दिले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्पादन शुल्क खात्यातही स्थानांतराचा भ्रष्टाचार केला !

आनंद कुलकर्णी यांनी यासंबंधी माहिती देतांना सांगितले की, वर्ष २०००-२००१ या काळात देशमुख उत्पादन शुल्क मंत्री होते. त्या वेळी त्यांनी राज्यातील ९० उत्पादन शुल्क निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या स्थानांतराची सूची आपल्याला पाठवली होती.

सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करता झोपलेले मतदार !

‘एखाद्या कार्यालयात साध्या चपराशाची चाकरी हवी असल्यास संबंधित उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पाहिली जाते; परंतु देशाचा संपूर्ण कारभार, अर्थव्यवहार आणि संरक्षणव्यवस्था पहाणारे आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधानपदासारख्या सर्वाेच्च पदावर जाण्यासाठीसुद्धा कोणत्याच शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नसते.