सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सर्व साधक ब्रह्मोत्सवाच्या दिशेने येत असतांना ‘देवच सर्व साधकांचे स्वागत करत आहे. दैवी वाद्ये वाजत आहेत आणि साधकांवर फुलांचा वर्षाव होत आहे’, असे मला जाणवले.

आम्ही माऊलीच्या लेकी, वर्णू जयंत थोरवी ।

‘रथोत्सवात नृत्यसेवा करणार्‍या सर्व साधिकांपैकी मीही एक आहे आणि आम्ही सर्व जणी फेर धरून पारंपरिक फेराचे नृत्य करत गीत म्हणत आहोत’, असे मला वाटले. त्या वेळी माऊलींच्या स्तुतीचा अनाहतनाद फेराच्या गीताच्या माध्यमातून माझ्या मनात अखंड उमटत राहिला. ते गीत पुढे दिले आहे.

मनगटाचा अस्थीभंग झाल्यावर सकारात्मक आणि भावस्थितीत राहून अखंड गुरुकृपा अनुभवणार्‍या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या शिवमोग्गा (कर्नाटक) येथील सौ. स्मिता कानडे (वय ५६ वर्षे) !

रुग्णालयात जातांना भगवंताने मला विचार दिला, ‘प्रारब्ध आनंदाने आणि भावाच्या स्थितीत राहून भोगूया.’ भगवंतानेच माझ्याकडून भावाचे प्रयत्न करून घेतले. यासाठी भगवंत आणि गुरुदेव यांच्या चरणी कितीही वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती वसुधा देशपांडे (वय ७० वर्षे) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

साधारण दीड वर्षापासून नामजप करायला लागल्यानंतर तंबोर्‍याची तार छेडल्यासारखे होऊन शरिरातून सूक्ष्म आवाज येतो आणि कंप होतो. त्यामुळे मला त्रास न होता आनंद होतो.

गॅसवरील कढई वाकडी होऊन उकळते तेल हातावर पडतांना घाटकोपर, मुंबई येथील कु. आदिनाथ बांगर याने अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

कढईतील उकळते तेल हातावर पडल्यामुळे मला पुष्कळ त्रास होत होता. घरी आल्यानंतर माझा नामजप आपोआप चालू झाला आणि नामजपामुळे मला होणारा त्रास पुष्कळ प्रमाणात उणावला. गुरुदेवांच्या कृपेमुळे ही अनुभूती आल्याने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो !

निरपेक्ष, अनासक्त आणि ईश्वरावर दृढ श्रद्धा असणारे चिराला (जिल्हा प्रकाशम्, आंध्रप्रदेश) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्रीबदरी नारायण आरवल्ली (वय ५२ वर्षे) !

मामा प्रतिदिन घरात वैष्णव संप्रदायानुसार भावपूर्ण पूजा करतात. त्यामुळे त्यांच्या घरातील चैतन्य वाढले आहे. तिरुपति वेंकटेश्वर स्वामीच्या मंदिरात जसा चंदन आणि तुळस यांचा सुगंध येतो, तसाच सुगंध त्यांच्या देवघरातही येतो.

सनातन-निर्मित देवतांची चित्रे, सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांतील चैतन्यामुळे साधना अन् सेवा करण्यास आरंभ होणे

मी सनातनची सर्व उत्पादने घेतली, उदा. उदबत्ती, कापूर, अष्टगंध, कुंकू, साबण. तेव्हा मला त्या उत्पादनांमधूनही चैतन्य जाणवले. तेव्हा ‘मन एकाग्र होणे, नामजप आणि प्रार्थना करतांना चित्ताची एकाग्रता, उत्साह, आनंद अन् शांती’, असे मला जाणवायला लागले.

पूर्ण वेळ साधना करण्यास आरंभ केल्यावर गोवा येथील श्री. अरुण कुलकर्णी यांना झालेले त्रास आणि गुरुकृपेने त्यांना आलेल्या अनुभूती

साधनेत पूर्णवेळ होण्याचा निर्णय घेतल्यापासून मला शारीरिक आजार चालू झाले. ‘उच्च रक्तदाबा’चे निदान झाले. मी नवी मुंबई येथील एका पुलावर चक्कर येऊन पडलो आणि बेशुद्ध झालो.

भाव, भक्ती आणि श्रद्धा यांद्वारे निरंतर ईश्वरभक्ती करणार्‍या अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील सौ. सुमन चव्हाण (वय ७० वर्षे) जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

१७ नोव्हेंबर या दिवशी एका अनौपचारिक सत्संगात त्यांनी ही वार्ता दिली. या वेळी सौ. सुमन चव्हाण यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.