नामजपाची आवड असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उरण (जिल्हा रायगड) येथील कु. प्रार्थना योगेश ठाकूर (वय ६ वर्षे) !
प्रार्थना म्हणते ‘‘मी रामनाथीला डॉक्टरबाबांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) सेवा करीन.’’ तिला कुणी पैसे दिल्यास ती मला ‘ते पैसे डॉक्टरबाबांना अर्पण कर’, असे सांगते. तिला ‘डॉक्टरबाबा म्हणजे सर्वकाही’, असे वाटते. ती रात्री झोपतांना शेजारी श्रीकृष्णाचे चित्र ठेवते. तिला तिच्या हृदयात हनुमंत दिसतो.’