परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘साम्यवाद्यांना प्रारब्ध इत्यादी शब्दही ज्ञात नसल्याने ते ‘साम्यवाद’ हा शब्द वापरतात आणि हास्यास्पद ठरतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘साम्यवाद्यांना प्रारब्ध इत्यादी शब्दही ज्ञात नसल्याने ते ‘साम्यवाद’ हा शब्द वापरतात आणि हास्यास्पद ठरतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
देवावर आणि साधनेवर विश्वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात, असे म्हणण्यासारखे आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मानवाला माणुसकी न शिकवणार्या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले