
मॉरिशस – येथील लॉग माऊंटन परिसरातील ‘लोकमान्य टिळक विद्यालया’च्या शताब्दी महोत्सवानिमित्त लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. मॉरिशसमधील भारतीय ऊस कामगारांवर टिळक यांचा प्रभाव होता. त्यामुळे वर्ष १९२६ मध्ये स्थापन झालेल्या या हिंदी विद्यालयाला टिळकांचे नाव देण्यात आले. मॉरिशसचे राष्ट्रपती धर्मबीर गोकुल यांच्या हस्ते ‘हिंदी प्रसारणी सभे’च्या आवारात हा सोहळा पार पडला. या वेळी मॉरिशसमधील महाराष्ट्र मंडळाच्या टिळक हॉलमध्ये टिळक यांच्या आणखी एका अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
या वेळी मॉरिशसचे राष्ट्रपती गोकुल यांनी टिळकांच्या विचारांचा गौरव करतांना ‘हा कार्यक्रम म्हणजे भारतीय आणि मॉरिशस यांच्या सांस्कृतिक अन् ऐतिहासिक नात्याचा पूल आहे. मॉरिशसमध्ये भारतीय संस्कृतीचे जतन आणि हिंदी भाषेचे शिक्षण हे भारतीय वंशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दृकश्राव्य माध्यमाद्वारे (‘व्हिडिओ’द्वारे) उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले, ‘‘हा सोहळा भारत आणि मॉरिशस यांच्यामधील दृढ संबंध अन् टिळक यांच्या अमर विचारांचे प्रतीक आहे. या उपक्रमामुळे दोन्ही समाजांतील सांस्कृतिक नाते अधिक दृढ होईल.’’ कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शैलेश आणि कुणाल टिळक यांचे त्यांनी आभार मानले.
UK Intercepts Russian Tanker : ब्रिटनकडून रशियाची तेलवाहू नौका जप्त : एका भारतीय नागरिकाला अटक
US B-52 Bomber : अमेरिकेत विमान कोसळून ८ जण ठार
Norway Crown Princess’s Son : बलात्काराच्या प्रकरणी नॉर्वेच्या ‘क्राऊन प्रिन्सेस’च्या मुलाला ४ वर्षांचा कारावास !
Japanese Fans Clean Stadium : सामना संपल्यानंतर जपानी प्रेक्षकांनी ‘स्टेडियम’मध्ये पडलेला कचरा स्वतः उचलून परिसर केला स्वच्छ !
U.K.Banned Social Media : आता युनायटेड किंगडमनेही घातली लहान मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर बंदी !
बांगलादेशातील शिवगंज उपजिल्ह्याचे नाव पालटून ‘महास्थान’ होणार !