कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !

मुंबई – कुटुंबातच भूमीच्या वाटणीसाठीचे न्यायालयीन वाटप आणि संमतीने होणार्‍या मोजणीसाठी प्रतिपोटहिस्सा २०० रुपये घेण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यासाठी भूमीची नियमित मोजणी ९० दिवसांत, तर द्रुतगती मोजणी ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण भागांत २ हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी २ सहस्र रुपये, तर द्रुतगती मोजणीसाठी ८ सहस्र रुपये इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे. शहरी भागांत १ हेक्टरपर्यंत मोजणीसाठी ३ सहस्र रुपये, तर द्रुतगती मोजणीसाठी १२ सहस्र रुपये इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे. कनिष्ठ भूमापकाच्या मोजणीवर आक्षेप असल्यास पडताळणीसाठी ३ ते ५ पट अधिक शुल्क आकारले जाणार आहे. निमशासकीय संस्थांना मोजणी दरात ५० टक्के, तर पूर्णतः शासकीय भूमींसाठी ७५ टक्के सवलत असणार आहे.