केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !

दिनदर्शिकेचे प्रकाशन करतांना  श्री. राजेंद्र आर्लेकर यांसह अन्य मान्यवर

आळंदी (जिल्हा पुणे) – सनातन हिंदु संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणार्‍या भारतीय कालगणनेचा प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने ‘चैतन्य फाऊंडेशन, गोवा’ यांच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या ‘चैतन्य’ या दिनदर्शिकेचे नुकतेच माऊलींच्या चरणी भावपूर्ण वातावरणात प्रकाशन करण्यात आले. केरळम् आणि तमिळनाडू राज्यांचे राज्यपाल श्री. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर अन् त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनघा आर्लेकर यांनी ही दिनदर्शिका माऊलींच्या चरणी अर्पण करून तिचे विधीवत् प्रकाशन केले.

माऊलींच्या चरणी नतमस्तक होतांना श्री. राजेंद्र आर्लेकर अन् त्यांच्या पत्नी सौ. अनघा आर्लेकर

या वेळी पुणे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मा. अरविंद वानखेडे, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख अधिवक्ता राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, नगराध्यक्ष श्री. बबनराव कुर्‍हाडे आदींसह वारकरी भाविक उपस्थित होते.

श्री. राजेंद्र आर्लेकर यांचा सन्मान करतांना प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांसह अन्य मान्यवर
चैतन्य दिनदर्शिका