भोपाळच्या ‘कट्टरपंथी मॉड्यूल’ प्रकरणात ही सहावी अटक
पाकिस्तानसाठी ‘स्लीपर सेल’ सिद्ध करत असल्याचा आरोप
(स्लीपर सेल म्हणजे छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांध मुसलमानांचे स्थानिक गट)
(मॉड्यूल म्हणजे आतंकवादी कृत्यांचे नियोजन आणि त्याची कार्यवाही यांसाठी बनवलेला गट)
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

मधुबनी (बिहार) – येथून मदरसा संचालक, ५० वर्षीय मौलाना इजहार-उल-हक याला अटक करण्यात आली आहे. इजहार हा पाकिस्तानी दलाल असल्याचे सांगितले जात आहे. तो बिहारमध्ये ‘स्लीपर सेल’ सिद्ध करत होता. बिहारच्या आतंकवादविरोधी पथकाने ५ राज्यांतून समोर आलेल्या ‘कट्टरपंथी मॉड्यूल’च्या अंतर्गत त्याला अटक केली.
🚨 Madhya Pradesh & Bihar ATS has arrested Madarasa teacher Maulana Izhar-ul-Haq from a mosque in Madhubani over alleged links to a Pakistan-backed sleeper-cell network.
This is the sixth arrest in the Bhopal "radical module" case.
If proven in court, these are extremely grave… pic.twitter.com/L7uljzSsHQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 17, 2026
१. मधुबनी जिल्ह्यातील पंडौल पोलीस ठाण्याच्या सीमेत भाड्याच्या घरात रहाणारा इजहार मदरसा चालवत होता. त्याच्या भ्रमणभाषमध्ये भडकाऊ व्हिडिओही सापडले आहेत. यामध्ये भारतात शरीयत कायदा लागू करण्याविषयीच्या व्हिडिओंचाही समावेश आहे. तो ‘कट्टरपंथी मॉड्यूल’ला निधी पुरवण्याचे काम पहात होता. (अशा मदरशात कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जात असेल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सरकारने या मदरशावरही बंदी घातली पाहिजे. – संपादक)
२. भोपाळच्या काजी छावणीमधून पकडलेला आतंकवादी महंमद फराज उपाख्य खालिद याच्या चौकशीनंतर इजहारला अटक करण्यात आली.
३. यापूर्वी उत्तरप्रदेशातील सहारनपूरमधून नईम अब्दुल्ला, राजस्थानच्या अलवरमधून शाकिर मेव आणि मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातून हाजी अजहरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर हरियाणाच्या नूंह येथून शाकिर याला याच ‘मॉड्यूल’च्या अंतर्गत पकडण्यात आले होते.
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक