वाशी महापालिका रुग्णालयातील प्रकार !
धर्मप्रेमींकडून पोलिसांना निवेदन

नवी मुंबई – येथील महापालिका रुग्णालयात ९ ते ११ महिन्यांच्या मुलाला गोमांस खाण्याचा सल्ला देणारे भित्तीपत्रक लावणार्यांवर धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने केली आहे. या प्रकरणी त्यांनी वाशी पोलीस ठाणे येथे निवेदन दिले आहे. याविषयीची भित्तीपत्रके विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी फाडली.
“Register a case against those who advised feeding beef to young children!” – VHP 🚩
A highly concerning incident has come to light at Vashi Municipal Hospital.
Memorandum submitted to the police demanding immediate action.
In a state that honors Go Rakshaks, how could such… pic.twitter.com/78bOZZRNy7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 16, 2026

निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. १४ जून या दिवशी कार्यकर्ते रोहित खंडागळे महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात गेले होते. या वेळी त्यांना रुग्णालयाच्या भिंतीवर ‘भारतीय बालरोग अकादमी (IAP)- IYCF विभाग’च्या नावाने ‘वय ९ ते ११ महिने पूरक आहार मार्गदर्शक’ या शीर्षकाखाली भित्तीपत्रक लावलेले दिसले.
२. त्यात बारीक चिरलेले मांस (चिकन, मटण, गोमांस) असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. हिंदु धर्मात गाय पवित्र मानली जाते. त्यामुळे गोमांस भक्षण करणे हिंदु धर्मविरोधी आहे. बाळाला गोमांस खाऊ घालण्याचा सल्ला देणे, हे अत्यंत निंदनीय असून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. सार्वजनिक ठिकाणी असे भित्तीपत्रक लावणे हे जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न वाटतो.
३. या प्रकरणी भारतीय बालरोग अकादमी आणि भित्तीपत्रक लावणारे संबंधित अशांवर गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे आक्षेपार्ह भित्तीपत्रक तात्काळ हटवण्याचे आदेश द्यावेत.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर