शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
(‘स्टँडअप कॉमेडी म्हणजे ‘एकपात्री विनोदी कार्यक्रम’)

मुंबई – कलेच्या नावाखाली अश्लील आणि अनैतिक संवाद असलेल्या ‘स्टँडअप कॉमेडी’चे कार्यक्रम करणारा प्रणित मोरे आणि अन्य यांच्यावर गुन्हे नोंदवावेत, तसेच असे कार्यक्रम ‘सेन्सॉर’च्या (परिनिरीक्षण मंडळाच्या) कार्यकक्षेत आणावेत, अशी मागणी शिवसेनेच्या विधान परिषदेच्या मुख्य प्रतोद (संबंधित राजकीय पक्षाची विधानमंडळातील उत्तरदायी व्यक्ती) आणि प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्राची प्रत आमदार (डॉ.) मनीषा कायंदे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनाही पाठवली आहे.

पत्रामध्ये डॉ. मनीषा कायंदे लिहिले आहे की…
१. मागील काही दिवसांपूर्वी प्रणित मोरे याने त्याच्या कार्यक्रमात केलेले अश्लील संवाद आणि अवमानकारक वक्तव्ये सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाली आहेत. या वक्तव्यांमुळे विविध शासकीय, तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये यांमध्ये देहदान किंवा अवयवदान करणारे यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अवयव दानाच्या मोहिमेवरही अशा वक्तव्याचा अत्यंत नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
२. सामाजिक माध्यमांवर प्रभाव टाकणारे मनोरंजन आणि कला यांच्या नावाखाली ‘स्टँडअप कॉमेडी’द्वारे समाजात अश्लीलता पसरवत आहेत. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना त्यांच्याविषयीही ‘स्टँडअप कॉमेडी’मध्ये आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली होती.
३. हा कार्यक्रम करणारा प्रणित मोरे आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या डॉ.सेजल पवार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे; मात्र अशा प्रकारे वारंवार घडणार्या घटना कायमच्या रोखण्यासाठी कडक कारवाई होण्याची नितांत आवश्यकता आहे.’’
काय आहे प्रकरण ?
प्रणित मोरे याच्या एकपात्री विनोदी कार्यक्रमात मुंबईतील ‘केईएम्’ रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणार्या डॉ. सेजल पवार हिने रुग्णालयात देहदानाद्वारे आलेल्या पुरुषांच्या मृतदेहाच्या खासगी अवयवांविषयी अश्लील आणि आक्षेपार्ह टिपणी केली होती. तिच्या या टिपणीवर प्रणितने हसून प्रोत्साहन दिले होते. या वेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी हसून प्रतिसाद दिला. हा प्रकार सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाला, तेव्हा सर्वच स्तरावरून जोरदार टीका झाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. सेजल पवार हिला रुग्णालय प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर