
प्रतापगड (उत्तरप्रदेश) – भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे; कारण तो हिंदूबहुल आणि सनातनबहुल आहे. कोणताही मुसलमानबहुल देश धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) नाही. जर एखादा असेल, तर सांगा. प्रत्येक मुसलमानबहुल देशात शरीयत कायदा लागू आहे. जोपर्यंत भारत हिंदूबहुल आहे, तोपर्यंतच आपली राज्यघटना आहे आणि तोपर्यंतच आपण धर्मनिरपेक्ष देश आहोत, असे विधान जनसत्ता दल लोकतांत्रिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे आमदार रघुराज प्रताप सिंह उपाख्य राजा भैया यांनी एका मुलाखतीत केले.
फाळणीच्या वेळी पाकिस्तानात जाणार्या मुसलमानांना हिंदूंनी थांबवले !
राजा भैया म्हणाले की, आपल्या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली आहे, हे आपण विसरता कामा नये. मुस्लिम लीगने मागणी केली होती, ‘आम्हाला एक इस्लामी राष्ट्र हवे आहे’ आणि अशा प्रकारे भारताचे तुकडे झाले. त्यानंतर पूर्व पाकिस्तान वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश बनला. या सर्व गोष्टी धर्माच्या आधारावर झाल्या होत्या. फाळणीच्या वेळी जे मुसलमान पाकिस्तानात जात होते, त्यांना हिंदूंनी थांबवण्याचे काम केले होते. (आता धर्मांध मुसलमानांना पाकिस्तानात पाठवण्याची वेळ आली आहे ! – संपादक)
हिंदु सनातन धर्म अनादी आहे !
राजा भैया म्हणाले की, या धरतीवर जितके धर्म आणि पंथ आहेत, त्या सर्वांच्या प्रारंभाचा एक दिनांक आहे. ख्रिस्ती पंथ अमूक दिनांकापासून चालू झाला, इस्लाम पंथ अमूक दिनांकापासून चालू झाला, शीख पंथ अमूक दिनांकापासून चालू झाला; पण हिंदु सनातन धर्म अनादी आणि अनंत आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर पंथ स्थापन करणारी एक व्यक्ती किंवा महापुरुष होते; पण हिंदु धर्माची उत्पत्ती एका महापुरुषाकडून झालेली नाही, तो शाश्वत आहे. म्हणूनच त्याला ‘सनातन’ म्हटले गेले आहे. त्यामुळे सनातन धर्मापुढे सर्वांना झुकावे लागेल.
हिंदु धर्मातील त्रुटी दूर होत आहेत !
राजा भैया म्हणाले की, माझ्या कार्यशैलीत आणि आपल्या हिंदु धर्मात ज्या काही त्रुटी (जातीवाद इ.) आल्या आहेत, त्या दूर करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि या त्रुटी दूर होत आहेत. हिंदु आता जागा होत आहे. हिंदूंमध्ये आता आपला देश आणि धर्म यांबद्दल जागरूकता येत आहे.
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड