मुंबई – संशोधन आणि विकास, नवोक्रम, उत्पादन, उपयोजना, तसेच दुरुस्ती अन् पुनर्बांधणी या क्षेत्रांत स्वयंचलित प्रणाली राबवता यावी, यासाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण २०२६’ निश्चित करण्यात आले आहे. १६ जून या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली.
या धोरणामुळे ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांच्या निर्मितीक्षेत्राला चालना मिळणार आहे. यातून या क्षेत्रांतील उद्योग, त्यासाठीची गुंतवणूक यांना प्रोत्साहन मिळणार आहे. धोरणामुळे या क्षेत्रात २५ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, तसेच १ लाखाहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची संधी निर्माण होणार आहेत, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ग्रामीण पातळीपर्यंत दर्जेदार इंटरनेटसाठी ‘महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ स्थापन !