साधिकेवर प्रेमाचा वर्षाव करणारे सनातनचे पहिले बालक संत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) !

मला त्यांच्यातील ‘प्रेमभाव, निरीक्षण, इतरांचा विचार, मोठ्यांचा आदर करणे आणि इतरांना आधार देणे’, हे गुण लक्षात आले. ‘बालक संतही निर्व्याज प्रेम करणारे आहेत’, हे माझ्या लक्षात आले.

बेळगाव येथील पुष्पांजली पाटणकर यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होण्यापूर्वी त्यांना आलेल्या सुंदर अनुभूती !

‘देवा, ६० टक्के पातळीला इतक्या अनुभूती, मग ७० टक्के आणि ८० टक्के पातळीला किती सुंदर अनुभूती असतील ? वास्तविक आपले सतत देवाकडे ‘लक्ष’ हवे; पण ‘देवाचे आपल्यावर किती लक्ष आहे ?’, हे पाहून आनंदाने ऊर भरून आला.

रामनाथी आश्रमात गरुड पक्षी याग होत असतांना मंगळुरू येथे पू. भार्गवराम प्रभु यांना जाणवलेली सूत्रे

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! पू. भार्गवराम भरत प्रभु हे या पिढीतील आहेत !

प्रेमभाव, स्थिरता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील सौ. प्रमिला ननावरे (वय ४३ वर्षे) !

सकारात्मक आणि आनंदी असणार्‍या सनातनच्या अकलूज येथील साधिका सौ. प्रमिला ननावरे यांची पू. (कु.) दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या समष्टी संत) आणि सहसाधिका सौ. उल्का जठार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कौशल्यपूर्ण आणि तळमळीने सेवा करणारे नंदुरबार येथील चि. राहुल मराठे अन् प्रांजळ, आणि मनापासून साधना करणाऱ्या रामनाथी आश्रमातील चि.सौ.कां. प्रतिभा मोडक !

श्री. राहुल मराठे यांचा परिपूर्ण सेवा करण्याकडे कल असतो. ते कौशल्याने, भावपूर्ण आणि गुरुदेवांना शरण जाऊन सेवा करण्याचा प्रयत्न करतात. कु. प्रतिभाला कोणतीही सेवा सांगितल्यावर किंवा तिचे सेवेत साहाय्य मागितल्यास ती उत्साहाने आणि तत्परतेने सेवा करते.

गुरूंवर श्रद्धा ठेवून धर्मसेवा म्हणून पत्रकारिता करणारे साधक-वार्ताहर श्री. अरविंद पानसरे (वय ४४ वर्षे) !

पत्रकारांचा लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्याशी संपर्क येतो. सर्वसाधारणपणे पत्रकार लोकप्रतिनिधींच्या प्रलोभनाला बळी पडून त्यांच्या प्रभावाखाली येतो; मात्र दादांनी आतापर्यंत गुरुकार्याशी एकनिष्ठ राहून धर्मसेवा केली आहे.

प्रेमळ, परिस्थिती आनंदाने स्वीकारणार्‍या आणि कृतज्ञताभावात असणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सौ. अलका भागडे (वय ६३ वर्षे) !

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सौ. अलका भागडे यांची लक्षात अालेली गुणवैशिष्ट्ये प्रस्तूत करत आहोत.

‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’मध्ये सहभागी साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात आले.

केदारनाथ येथे आदि शंकराचार्य यांच्या मूर्तीची स्थापना केल्याविषयी नवी देहली येथील निवृत्त कर्नल अशोक किणी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी व्यक्त केली कृतज्ञता !

आता आदि शंकराचार्य यांची मूर्ती स्थापन झाल्यावर निवृत्त कर्नल अशोक किणी यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना संदेश पाठवला होता.

यजमानांच्या आजारपणाच्या कालावधीत त्यांची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

ऑक्टोबर २०२० मध्ये सौ. समिधा पालशेतकर यांचे पती श्री. संजय पालशेतकर यांच्या मेंदूचे शस्त्रकर्म झाले. त्यांच्या रुग्णाईत स्थितीमध्ये त्यांना साहाय्य करत असतांना सौ. समिधा यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.