केदारनाथ येथे आदि शंकराचार्य यांच्या मूर्तीची स्थापना केल्याविषयी नवी देहली येथील निवृत्त कर्नल अशोक किणी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी व्यक्त केली कृतज्ञता !

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात बोलतांना निवृत्त कर्नल अशोक किणी (वर्ष २०१६)

५ नोव्हेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील आदि शंकराचार्य यांच्या समाधीस्थळाजवळ त्यांच्या भव्य मूर्तीचे अनावरण केले. वर्ष २०१३ मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या जलप्रलयामध्ये समाधीची मोठी हानी झाली होती. समाधी आणि त्याचा परिसर पुन्हा चांगला करण्यासाठी निवृत्त कर्नल अशोक किणी आणि अन्य धर्मप्रेमींनी आदि शंकराचार्य यांचे जन्मस्थल कालाडी (केरळ) येथून केदारनाथपर्यंत यात्रा काढली होती. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना केली होती. आता आदि शंकराचार्य यांची मूर्ती स्थापन झाल्यावर निवृत्त कर्नल अशोक किणी यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना संदेश पाठवला होता. याद्वारे त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी पाठवलेला संदेश बाजूला दिला आहे.

प्रणाम,

पूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या मार्गदर्शनाने अन् प्रेमाने आम्ही जे ध्येय ठरवले होते, ते पूर्ण झाले. आज (५ नोव्हेंबर) पंतप्रधानांनी आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरणाद्वारे ते पूर्ण केले. नाशिक, पुणे, मुंबई, मंगळुरू आणि बेंगळुरू येथे आम्हाला मिळालेला पाठिंबा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक होता.

कृतज्ञ,

तुमचे आशीर्वाद मिळत राहोत.