‘सिमी’ संघटनेवर बंदी : केंद्रशासनापाठोपाठ राज्यशासनानेही काढले आदेश

बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.

श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरातील श्री गणपतीची मूर्ती विधी न करता हटवल्याचा भाविकांना संशय !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !

मतदान केंद्रांवरील सुविधांविषयी विशेष भर द्या ! – उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड

‘मतदान केंद्रांवर वीज, आवश्यक फर्निचर, पंखे, रॅम्प, स्वच्छतागृहे सुस्थितीत असावीत. पिण्याच्या पाण्याची सोय ठेवावी. शिक्षणाधिकार्‍यांनी प्रशिक्षणाविषयी आदेशाची बजावणी करावी’

संशयित आरोपी फहाद शेख याची जामिनावर मुक्तता

फहाद याने पीडितेची ओढणी ओढून तिच्याशी गैरवर्तन केले , त्यानुसार पोलिसांनी फहाद याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करत त्याला अटक केली.

काय करायचे ? काय करायचे नाही ? याविषयी दक्ष रहा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी याविषयी दक्षता घेऊन कार्यवाही करावी. दिलेले काम समन्वयाने चोखपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक विषयक साहित्याचे वाचन करावे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे नाव हे ‘शिवनेर’ तालुका असल्याचे अनेक पुरावे सापडले !

छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानामुळे शिवनेर या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे जुन्नर या नावात पालट करून ‘शिवनेरी’ तालुका असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बीड आणि भिवंडी येथील उमेदवार घोषित !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनावणे आणि भिवंडीमधून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी या पक्षाचे ५ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

संजय निरूपम यांच्याकडून काँग्रेसचे त्यागपत्र !

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसकडून संजय निरूपम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती; मात्र ही जागा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे गटाला देण्यात आली.

नागपूर येथील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही !

बर्वे प्रकरणात राज्य सरकारने नव्याने त्यांच्या चौकशीचे आदेश लागू केले आहेत, तसेच गेल्या आठवड्यात जिल्हा जातपडताळणी समितीनेही बर्वे यांना नोटीस बजावली होती.

गोवा : खनिज वाहतूक करण्यासाठी ‘मानक कार्यवाही प्रक्रिया’ सिद्ध करण्याचा न्यायालयाचा आदेश !

उच्च न्यायालयाने राज्यातील गावांमधून खनिज वाहतुकीवर बंदी घालण्याच्या जानेवारी मासात दिलेल्या आदेशामुळे खनिज वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यावर तातडीने उपाय न काढल्यास गोव्यातील खाण व्यवसाय बंद पडण्याची शक्यता आहे.