पुणे येथील एका शाळेत शिपायाचा १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न !

पीडित मुलाच्या आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. अत्याचाराविषयी कुणाला काही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती.

हिंदूंमध्ये शौर्यवृद्धी व्हावी आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे यांसाठी नंदुरबार जिल्ह्यात १२ ठिकाणी गदापूजन !

गदापूजनाच्या कार्यक्रमासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

पुणे जिल्ह्यांत हिंदूंमध्ये शौर्यजागृती व्हावी यासाठी आयोजित ‘गदापूजन’ उत्साहात पार पडले !

हिंदूंनी शस्त्रपूजन करणे, हे त्यांच्यातील क्षात्रवृत्तीच्या वाढीसाठी पोषक आहे !

गोवा : केरी येथे पार पडला श्री विजयादुर्गा देवस्थानचा सुवर्ण शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सव !

‘दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठम् शृंगेरी’चे जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती सन्निधानम् स्वामी यांच्या अमृत हस्ते श्री. संजय किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत हा सुवर्णकलश विधीवत प्रतिष्ठापित करण्यात आला.

गोवा : कला अकादमीतील एका ‘फॉल्स सिलिंग’चा भाग कोसळला !

या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, ‘‘भ्रष्टाचारासह निकृष्ट दर्जाची कामे, हे भाजपच्या विकसित भारताचे ‘मॉडेल’ आहे.’’

‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी’ का चालत नाही ? – संजय राऊत

भारत निर्वाचन आयोगाचे नाव बदलून भाजप निर्वाचन आयोग करावे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.

७० वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देहली येथे होण्याची शक्यता !

देहलीसमवेतच इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), औंध (जिल्हा सातारा), औदुंबर (जिल्हा सांगली) मुंबई आणि धुळे येथूनही निमंत्रणे आली आहेत

वर्ष २०१९ मध्ये भाजपसमवेत जाण्यासाठी अजित पवार यांना माझी मान्यता होती ! – शरद पवार

त्या वेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर कारवाईचा दिखावा केला होता; मात्र हे सर्व स्वत:च्या पाठिंब्यानेच चालू असल्याची स्वीकृती शरद पवार यांनी या मुलाखतीमध्ये दिली.

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार अंत्यसंस्काराला जाण्यासाठीही पैसे घेतात ! – अनुज साहनी, अभिनेता

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार पार्ट्या, मोठ्या उद्योगपतींकडील विवाह आदी ठिकाणी दिसतात. कुणाचा मृत्यू झाला असेल, तर त्यांचा अंत्यसंस्कार किंवा प्रार्थना सभा यांनाही हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित रहातात.

पुणे येथे १२ वर्षांपासून रहाणार्‍या ४ बांगलादेशी महिलांना अटक !

इतकी वर्षे प्रशासन किंवा पोलीस यांच्या कुणाच्याच हे लक्षात कसे आले नाही ? बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत !