ताम्रपोथी वाचक श्री. अमरेश्‍वर मिश्रा यांनी केलेल्या ताम्रपोथी वाचनाप्रमाणे काकतपूर (ओडिशा) येथे सनातन संस्थेवरील संकटे दूर होण्यासाठी सप्तशती चंडीयाग संपन्न !

‘सूरत येथील नाडीपट्टीचे अभ्यासक श्री. मनोज शिंदे यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितले होते की, ओडिशा राज्यातील काकतपूर नावाच्या एका छोट्याशा गावात एक ताम्रपोथी आहे. २३.७.२०१८ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सर्वश्री दिवाकर आगावणे, स्नेहल राऊत, सत्यकाम कणगलेकर आणि विनायक शानभाग हे ४ विद्यार्थी-साधक ओडिशा येथे गेले होते.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी विशाखापट्टणम् येथील साधकांचे शंकानिरसन करतांना सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे !

१. देवाच्या सतत अनुसंधानात रहावे आणि ‘आज आलेला चांगला विचार उद्या चांगली कृतीही नक्कीच करवून घेईल’, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा !…..

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सहसाधकांप्रती असलेला भाव !

‘दौर्‍यात समवेत असलेले साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप आहेत’, असा भाव ठेवून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रतिदिन त्यांची मानसपूजा करणे आणि ‘हे माझे देवापर्यंत जाण्यासाठीचे प्रयत्न असून ते मला शेवटपर्यंत करायला हवेत’, असे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगणे ……

रामेश्‍वरम् येथे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना वास्तुदेवतेच्या संदर्भात आलेली अनुभूती आणि वास्तुदेवतेला प्रार्थना करण्याचे त्यांनी सांगितलेले महत्त्व !

१. सद्गुरु काकूंना दैवी सावलीने ‘मी येथील वास्तुदेवता आहे’, असे सांगणे: ‘एकदा आम्ही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग रामेश्‍वरम् येथे गेलो होतो. तेथे एका धर्मशाळेत दोन खोल्या घेऊन आम्ही रहात होतो. दौर्‍यातील पाच साधक सेवा संपवून नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजता स्वतःकडून झालेल्या दैनंदिन चुकांच्या अभ्यासासाठी सत्संगाला बसलेे होते.

साधनेच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर आणि परात्पर गुरुदेवांवर अपार श्रद्धा असणारे सनातनचे ५१ वे संत पू. जयराम कृष्णाजी जोशी (वय ७९ वर्षे) !

१. बालपण
१ अ. गाई आणि म्हशी यांचे दूध काढून घरोघरी दूध देऊन शाळेत जाणे : ‘माझ्या वडिलांचा दुधाचा व्यवसाय होता. मला वयाच्या आठव्या वर्षापासून पहाटे ४ वाजता गाई आणि म्हशी यांचे दूध काढणे, शेण काढणे अन् गोठा स्वच्छ करणे, यांसाठी उठावे लागत असे.

परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि श्रीविष्णुच असल्याचे वाटून याच रूपात त्यांची चित्रे काढून भावविश्‍वात रमणारी कु. मानसी कुलकर्णी !

‘गेल्या दीड वर्षापासून मला प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) ‘श्रीकृष्णच आहेत’ असे वाटायचे, तर कधी ते साक्षात ‘श्रीविष्णूच आहेत’, असे वाटायचे. ‘त्यांचे श्रीकृष्णाच्या  किंवा श्रीविष्णूच्या रूपात चित्र काढावे’, असे तीव्रतेने वाटत होते.

अहंकार जडू नये, यासाठी दास्यत्व पत्करणेच आवश्यक असल्याचे श्रीगुरूंनी रामनाथी आश्रम परिसरातील लागवडीतील माकडांना घालवण्याच्या कृतीतून शिकवणे

‘१४.१२.२०१६ या दिवशी मी रामनाथी आश्रम परिसरातील लागवडीत गेलो होतो. लागवडीत सेवा करणारे एक साधक मला म्हणाले, ‘‘वर जात आहेस, तर आलेल्या माकडांना घालव.’’ मी त्यांना म्हटले, ‘‘ते अंगावर आले, तर मला भिती वाटते.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मधाळ वाणीतून विशाखापट्टणम् येथील साधकांना मिळालेले साधनेचे अनमोल ज्ञानामृत !

‘साधकाने प्रत्येक व्यक्तीत देव पाहून साधना करावी. ‘सर्वांमध्ये देवाचे रूप पाहून त्यांना प्रेम देणे’, हीच आपली साधना आहे. देवाने आपल्या अंतरात प्रवेश केल्यावर आपल्याला बाहेरही सर्वत्र देवच दिसतो. आपण जे काही करतो, ते भावपूर्ण करून ईश्‍वराला अर्पण करावे.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ईश्‍वरीय ज्ञान मिळण्याची अद्भुत, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया !

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ पूर्णवेळ साधना करण्यासाठी गोव्याला रहायला आल्या. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना ज्ञानाचा पहिला प्रश्‍न विचारला, ‘सात स्वर म्हणजे काय ? आणि त्यांची उत्पत्ती कुठून झाली ?’, त्या वेळी त्या साधनेत नवीनच होत्या…….

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now