शिक्षकांनी ‘नैतिक मूल्य’ जपावे !

आदर्श विद्यार्थी घडवण्यासमवेत, आदर्श शिक्षक घडवण्यासाठी कार्यशाळा सरकारने आयोजित करायला हवेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवी !

महिला बंदीवानांच्‍या समस्‍या !

कारागृहात आल्‍यानंतर गुन्‍हेगारी वृत्ती नष्‍ट होण्‍यासाठीचे पूरक वातावरणही हवे. कारागृहात मूलभूत सुविधांचीच वानवा असेल, तर गुन्‍हेगारी वृत्ती नष्‍ट होण्‍यासाठीच्‍या सूत्रापर्यंत प्रशासन कधी पोचणार ? गुन्‍हेगार होण्‍यापासून थांबवणे आणि गुन्‍हेगारी वृत्ती नष्‍ट होण्‍यासाठीचे प्रयत्न सरकारने युद्धपातळीवर करणे आवश्‍यक !

षड्रिपूंवर नियंत्रण हवेच !

लहानपणापासूनच मुलांवर योग्‍य संस्‍कार देणे आवश्‍यक आहे. भावनांना आवर घालणे, मनाची स्‍थिरता, सहनशीलता, समजूतदारपणा, परिस्‍थिती स्‍वीकारणे आदी गुणांच्‍या साहाय्‍याने प्रतिकूल परिस्‍थितीवर मात करणे सहज शक्‍य आहे, तसेच याला अध्‍यात्‍माची जोड दिल्‍यास मनावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.

असुरक्षित पोलीस !

‘अतिक्रमण करणे चुकीचे आहे’, हे ठाऊक असूनही आणि भर रस्‍त्‍यात अतिक्रमण होत असतांनाही प्रशासन त्‍याची वेळीच नोंद घेत नाही, हेही अनाकलनीय आहे. एकूणच असुरक्षित पोलीस ही भारतासाठी धोक्‍याची घंटा आहे, हे नक्‍की !

निमंत्रणपत्रिका कशासाठी ?

विवाह हा मनोरंजनाचा आणि बडेजाव करण्‍याचा विषय बनत चालला आहे. हे सर्व थांबण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे. धर्मशिक्षणाने व्‍यक्‍तीला कुठे आणि कसे वागायला हवे ? याची जाणीव होईल. यामुळे सरकारने आणि प्रत्‍येक व्‍यक्‍तीने धर्मशिक्षण घेण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत !

धार्मिक स्‍थळे दुर्लक्षित का ?

हिंदूंंनी आपला हा प्राचीन वारसा जपण्‍यासाठी एकजूट होऊन प्रयत्न केल्‍यास मंदिरांचे वैभव जपण्‍यासाठी निश्‍चितच साहाय्‍य होईल. जनतेला धर्मशिक्षण दिले असते, तर मंदिरांचे महत्त्व लक्षात आले असते आणि जनतेनेच मंदिरांचे संवर्धन केले असते !

बनावट शाळांना अटकाव हवाच !

राज्‍यात ७५ सहस्रांहून अधिक विद्यार्थी हे मदरसा आणि अमान्‍यताप्राप्‍त शाळांमधून शिक्षण घेत आहेत, ही गोष्‍टही गंभीर आहे. अनधिकृत शाळा बंद केल्‍या पाहिजेत; कारण बनावट शाळांमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्‍यांचे भविष्‍य धोक्‍यात येऊ शकते.

वीटभट्टी कामगारांची समस्‍या !

वीटभट्टी व्‍यवसाय बंद पडल्‍यास बांधकामे बंद पडतील. त्‍यामुळे भविष्‍यात बांधकाम व्‍यवसायावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे अर्थचक्र फिरते रहाण्‍यासाठी या उद्योगाला राजाश्रय हवा, तरच वीटभट्टी कामगारांवर आलेली उपासमारीची वेळ टळून त्‍यांना मुबलक रोजगार उपलब्‍ध होईल, हे निश्‍चित !

‘ऑनलाईन खेळ’ एक जुगार ?

ऑनलाईन गेम खेळून पैसे मिळवण्‍याचा मार्ग सुकर वाटला, तरी तो रसातळाला नेणारा असल्‍याने याचे धोके ओळखून सावध होणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे ऑनलाईन गेमवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि यातून धर्मशिक्षणाची अपरिहार्यता लक्षात घ्‍यावी !

शेतीवर बांध न घालणारे मंगळवेढावासिय !

अन्‍य गावाच्‍या शेतकर्‍यांनीही मंगळवेढा गावाचा आदर्श घेऊन मनाचे बांध तोडून शेतीच्‍या बांधावरून होणारे वाद रोखावेत !