नोकरीचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार करणारा रतन विष्णु कांबळे (रहाणार नागवे रोड, कणकवली) याला येथील न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.

हिंदु नाव धारण करून हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधाला अटक

प्रेम करण्यासाठी धर्म का लपवावा लागतो, हे निधर्मीवादी सांगतील का ?

सावंतवाडी नगरपरिषदेने व्यवसायासाठी जागा द्यावी आणि कह्यात घेतलेले साहित्य परत द्यावे, यासाठी रवि जाधव यांचे उपोषण ४ थ्या दिवशीही चालू

नगरपरिषदेने गाळा हटवून त्यातील साहित्य अवैधरित्या कह्यात घेतले, असा आरोप रवि जाधव यांनी केला असून याच्या विरोधात त्यांनी सहकुटुंब उपोषण चालू केले आहे.

विरोध होणारे प्रकल्प राबवल्यास सरकारच्या विरोधात असहकार मोहीम छेडू ! – गोंयात कोळसो नाका संघटना

लोहमार्ग, महामार्ग दुपदरीकरण आणि तम्नार वीज प्रकल्प हे तीनही प्रकल्प राबवण्यावर गोवा शासन ठाम राहिल्यास असहकार मोहीम छेडण्याची चेतावणी गोंयात कोळसो नाका या अशासकीय संघटनेने दिली आहे.

देशद्रोहाचा गुन्हा असलेली रिव्हॉल्युशनरी गोवन्स विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

अशासकीय संस्था आणि देशद्रोहाचा ठपका असलेल्या रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे चालू मासाच्या अखेरीस राजकीय पक्षात रूपांतर होणार आहे, अशी घोषणा रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी केली.

केंद्रीय कृषी कायद्यांविषयी काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष अपप्रचार करत आहेत ! – राजकुमार चहर, अध्यक्ष, किसान मोर्चा, भाजप

राजकुमार चहर पुढे म्हणाले, कृषी कायद्यामुळे गोव्यासह सर्व देशाला लाभ मिळणार असल्याचे आगामी काळात सिद्ध होणार आहे.

मडगाव येथून २ अल्पवयीन मुलींचे अपहरण : पोलीस संशयित धर्मांधाच्या शोधात

चंद्रावाडो, फातोर्डा येथून १६ वर्षीय २ मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलीस सध्या संशयित आरोपी मौलवी अब्दुल देवगिरी याच्या शोधात आहेत.

तांडव वेब सिरीजवर त्वरित बंदी घाला ! – गोवा सुरक्षा मंच

हिंदूबहुल देशात देवतांची विटंबना करणार्‍या कलाकृतींवर बंदी घालण्याची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

उबेर मोटो या दुचाकी टॅक्सी अ‍ॅपवर वाहतूक खाते कारवाई करणार

राज्यात उबेर मोटो हे दुचाकी टॅक्सी अ‍ॅप अनधिकृतपणे कार्यरत असल्याची माहिती वाहतूक खात्याला मिळाली आहे. वाहतूक खात्याने डमी ग्राहकाच्या माध्यमातून उबेर मोटोवर कार्यरत असलेल्या दुचाकीचालकाचे संभाषण ध्वनीमुद्रित केले आहे.

वास्को येथे १० वी इयत्तेतील २ विद्यार्थी कोरोनाबाधित

एका विद्यालयातील २ विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत. हे दोन्ही विद्यार्थी एकाच वर्गात शिकत होते. यामुळे विद्यालयाचे नियमित वर्ग पुढील काही दिवसांसाठी रहित करण्यात आले आहेत.