हिंदूबहुल देशात देवतांची विटंबना करणार्या कलाकृतींवर बंदी घालण्याची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !
वास्को, २३ जानेवारी (वार्ता.) – हिंदूच्या देवतांची विटंबना करणार्या तांडव या वेब सिरीजवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी केली आहे.
नितीन फळदेसाई म्हणाले, वेब सिरीजचे दिग्दर्शक जब्बार यांनी आक्षेपार्ह भाग सिरीजमधून वगळावा, तसेच यापुढे हिंदूंच्या देवतांची विटंबना करणार नाही, असे त्यांनी लेखी दिले, तरच या वेब सिरीजला अनुमती द्यावी. सैफ अली खान यांनी यापूर्वीही हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे. वेब सिरीज बनवणारे हे स्वत:ला जागतिक पातळीवर चित्रकार म्हणून घोषित करून सरस्वतीची नग्न चित्रे काढणार्या एम्.एफ्. हुसेनचे वारसदार आहेत. हिंदूंना आता अतीसहनशीलता आणि अतीसमंजसपणा परवडणार नाही. प्रत्येक हिंदूने यावर आवाज उठवला पाहिजे. आपली संस्कृती आपणच टिकवली पाहिजे. इस्लामी देशांत पैगंबराच्या विरोधात बोललात, तर देहदंडाची शिक्षा आहे. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. सरकारने त्वरित वेब सिरीजवर बंदी घालावी.