आज कै. (श्रीमती) प्रभावती गजानन शिंदे यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
‘९.१.२०२६ या दिवशी माझी आई श्रीमती प्रभावती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ९० वर्षे) हिचे सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात देहावसान झाले. तिची देहावसानाची प्रक्रिया होत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सूक्ष्मातून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. सकाळी आईच्या श्वासाची गती न्यून झाल्याचे पाहून तिची प्राणशक्ती वाढण्यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी नामजपादी उपाय करणे
९.१.२०२६ या दिवशी सकाळी ९ वाजता मी आईच्या आश्रमातील खोलीत गेल्यावर पाहिले की, ‘आई तोंडाने श्वास घेत असून तिला दम लागल्यासारखे झाले आहे आणि तिच्या श्वासाची गतीही न्यून झाली आहे.’ तेव्हा तिची प्राणशक्ती वाढण्यासाठी मी नामजपादी उपाय केल्यावर तिला थोडे बरे वाटले.
२. आईच्या नाडीचे ठोके आणि रक्तदाब पुष्कळ न्यून होणे अन् दुपारी १ वाजेपर्यंत ही स्थिती टिकून रहाणे
सकाळी खोलीत येऊन वैद्या (सुश्री) माया पाटील यांनी आईला तपासले होते. नंतर त्या पुन्हा १० वाजता खोलीत आल्या. तेव्हा आईच्या हाताचे नाडीचे ठोके लागत नव्हते; परंतु तिचा श्वासोच्छ्वास चालू होता. तिच्या हृदयाचे ठोकेही चालू होते. तिचा रक्तदाब ६०/० म्हणजे वरचा रक्तदाब (सिस्टोलिक ब्लडप्रेशर) ६० होता आणि खालचा रक्तदाब (डायस्टोलिक ब्लडप्रेशर) यंत्रावर कळत नव्हता. (सर्वसाधारण निरोगी व्यक्तीचा रक्तदाब १२०/८० mmHg इतका असतो.) अशी स्थिती दुपारी १ वाजेपर्यंत होती.

| समाजातील व्यक्तींच्या मृत्यूच्या संदर्भात आपण पहातो की, एखाद्या व्यक्तीचे प्राण जात असतांना जमलेले नातेवाईक पुष्कळ अस्थिर झालेले असतात, तसेच सर्वांच्या मनात मृत्यूची एक भीती दाटलेली असते; मात्र सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या लेखातून लक्षात येते की, ते आईच्या मृत्यूच्या प्रसंगीही अत्यंत स्थिर होते. एवढेच नव्हे, तर जिज्ञासू वृत्तीने आणि शिकण्याच्या स्थितीत राहून आईचे प्राणोत्क्रमण होतांना ‘तिची शारीरिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया कशी होत आहे ?’, याचा अभ्यास करत होते. साधनेमुळे आणि ‘सद्गुरु’ या अध्यात्मातील उच्च स्थितीमुळे ‘भावनाप्रधानता दूर होऊन स्थितप्रज्ञ अवस्था कशी प्राप्त होते ?’, हे त्यांच्या उदाहरणातून शिकायला मिळते. – संकलक |
३. ‘व्यक्तीचा प्राण जात असतांना तिच्या सप्तचक्रांचे कार्य न्यून होऊन तेथील संवेदना जाणवणे नष्ट होते’, हे शिकायला मिळणे
दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी ‘आईसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावेत; म्हणून मी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय शोधत असतांना देवाने माझ्या मनात विचार दिला की, ‘आता आईसाठी उपाय करायला नकोत.’ या विचाराची निश्चिती करण्यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना सूक्ष्मातून विचारले. त्या वेळी ‘आता उपाय करायला नकोत’, असे मला सूक्ष्मातून उत्तर मिळाले. तेव्हा ‘अभ्यास म्हणून मी आईच्या सप्तचक्रांवरून बोटे फिरवली. तेव्हा मला कोठेच संवेदना जाणवत नाही’, असे लक्षात आले. यावरून ‘प्राण जात असतांना चक्रांचे कार्य अल्प होत जाते आणि तेथील संवेदना जाणवणे नष्ट होते’, हे मला शिकायला मिळाले.
४. आईच्या हृदयाच्या संवेदना स्वतःच्या शरिरात अनुभवतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना जाणवलेली सूत्रे
त्यानंतर ‘आईच्या श्वासाची गती आणखी न्यून झाली आहे’, हे कळल्यावर मी पुन्हा आईच्या खोलीत गेलो. तेव्हा वैद्या माया पाटील ‘स्टेथोस्कोप’ने (शरिराच्या आतील भागांच्या अवयवांची, उदा. हृदयाचे ठोके, रक्तदाब, तसेच श्वासोच्छ्वास आदींची तपासणी करण्याच्या उपकरणाने) आईला तपासत होत्या. तेव्हा मीही ‘आईच्या हृदयाच्या संवेदना माझ्या शरिरात मला कोठे जाणवतात का ?’, ते सूक्ष्मातून पहात होतो. तेव्हा ‘आईच्या हृदयाचे ठोके हळूहळू चालू आहेत’, असे मला जाणवले. मी याविषयी वैद्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘हृदयाचे ठोके अल्प प्रमाणात चालू आहेत.’’ मी अधूनमधून तसे तपासत असतांना ‘एका टप्प्याला संवेदना एकदम क्षीण झाल्या आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी वैद्यांनाही आईच्या हृदयाचे ठोके जाणवण्याचे प्रमाण अल्प झाले होते. जेव्हा हृदयाचे ठोके थांबले, तेव्हा मलाही आईच्या हृदयाच्या ठिकाणी स्पंदने जाणवणे बंद झाले आणि ‘तिचे देहावसान झाले’, हे मला कळले.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच मला हा अभ्यास करता आला. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांनी लिहून घेतलेले लिखाण कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !
इदं न मम ।’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद पनवेल. (११.१.२०२६)
|
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !