सोलापूर येथे झालेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

१. पू. दीपाली मतकर यांनी ‘सोहळ्यात तुम्हाला ग्रंथप्रदर्शनाची सेवा असेल’, असे सांगितल्यावर मन सकारात्मक होणे आणि सोहळ्यासाठी प्रार्थना होणे

‘२०.११.२०२५ या दिवशी सोलापूर येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात आला. त्या सोहळ्यानिमित्त सेवेचा निरोप देण्यासाठी मला पू. दीपालीताईंचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी मला सांगितले, ‘‘सोहळ्याच्या दिवशी तुम्हाला ग्रंथप्रदर्शनावर (स्टॉलवर) सेवा असेल.’’ त्या वेळी माझे मन आपोआप सकारात्मक झाले. पू. ताईंच्या माध्यमातून गुरुदेवांनी सोहळ्यासाठी अधिकाधिक प्रार्थना करण्यास सुचवले. त्याप्रमाणे माझ्याकडून पुष्कळ प्रार्थना होऊ लागल्या.

सौ. भारती पोगुल

२. ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी सेवा करत असतांना ‘प.पू. गुरुदेव हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि धर्मप्रेमी यांना हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी करून घेत आहेत’, असे मला जाणवत होते. 

३. दैनिकाचे नवीन वाचक आणि धर्मप्रेमी त्यांच्या शब्दांत दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी स्वतःचे मनोगत व्यक्त करत होते. त्या वेळी त्यांच्या बोलण्यात तळमळ जाणवत होती. 

४. ‘हा सोहळा नसून गुरुदेवांचा सत्संग आहे आणि ते सर्वांना साधनेसाठी शक्ती अन् चैतन्य देत आहेत’, असे जाणवणे

तेथे ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा चालू आहे’, याचा मला विसर पडला. ‘आम्ही सगळे परम पूज्यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) सत्संगातच बसलो आहोत’, असे मला वाटत होते. ‘परम पूज्य सर्वांना हसतमुखाने बघत आहेत आणि सर्व साधकांना सेवा अन् साधना करण्यासाठी शक्ती आणि चैतन्य देत आहेत’, असे मला जाणवत होते.’

– सौ. भारती पोगुल, सोलापूर (२२.१२.२०२५)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक