
१. निर्मळ आणि निरागस

‘कै. शिंदेआजी पुष्कळ निर्मळ आणि निरागस होत्या. त्यांना प्रतिदिन भेटल्याविना मला करमत नसे. त्यांच्यात पुष्कळ प्रेमाचा ओलावा होता. आजी भेटल्यावर मला आईची उणीव भासत नसे.
२. आज्ञापालन करणे
आजी उतारवयात देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहायला आल्या. त्यांना आश्रमजीवनाविषयी अधिक ठाऊक नव्हते. त्यांचे सुपुत्र सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांना नामजप करण्याचे नियोजन करून दिल्यावर आजींनी त्यानुसार कृती केली. आजींनी आज्ञापालन भावपूर्णरित्या करून सद्गुरु राजेंद्रदादांचे मन जिंकले.
३. शिंदेआजी रहात असलेल्या खोलीतही पुष्कळ चांगले पालट झाले होते. ‘खोलीतील आजींच्या पलंगाकडे पहातच रहावे’, असे मला वाटत असे.
४. श्रीमती शिंदेआजीचे अंत्यदर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे
अ. आजींचा लिंगदेह आनंदात आहे.
आ. ‘त्यांच्या देहावर घातलेल्या फुलांच्या माळा चैतन्याने भारित झाल्या आहेत’, असे मला वाटले.
माझ्या मनात गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता दाटून आली. ‘हे भगवंता, तुझे अस्तित्व चराचरात आहे’, याचीच प्रचीती तू प्रत्येक क्षणी देत आहेस’, त्याबद्दल मी अनन्य शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करते.’
– सुश्री मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.१.२०२६)
|
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !