दुकानातील हिंदु कर्मचार्याला होत असलेली मारहाण थांबवतांना झाली हत्या

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील गाझीपूर जिल्ह्यात लिटन चंद्र घोष या ५५ वर्षीय हिंदु मिठाई व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. या दुकानात काम करणार्या कर्मचार्यावर आक्रमण झाले; म्हणून घोष ते रोखण्यासाठी मधे आल्यावर त्यांच्यावर फावड्याने वार करून त्यांना ठार मारण्यात आले. या वेळी जमावाने ३ आरोपींना तात्काळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
लिटन चंद्र घोष यांचे बारानगर रोड भागात ‘बैसाखी स्वीटमीट अँड हॉटेल’ या नावाने दुकान आहे. १७ जानेवारीला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मासूम मिया नावाचा एक मुलगा दुकानात आला. त्या वेळी दुकानात काम करणार्या अनंत दास या १७ वर्षांच्या कर्मचार्याशी मासूम याचा वाद झाला. या वादानंतर दोघांमध्ये शिवीगाळ आणि मारामारी चालू झाली. यानंतर मासूमचे वडील महंमद आणि आई माजेदा हे दोघेही तिथे पोचले. त्यांनीही मासूमसह अनंत दास याला मारायला चालू केले. या वेळी लिटन घोष हे अनंतला वाचवण्यासाठी मधे पडले, तेव्हा मासूम, महंमद आणि माजेदा या तिघांनी लिटन घोष यांच्यावर फावड्याने वार केले. या जखमा इतक्या गंभीर होत्या की, लिटन घोष यांचा जागीच मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंना ठार मारण्यासाठी धर्मांध मुसलमानांना कोणत्याही कारणाची आवश्यकता नसते. त्यांचे लक्ष्य केवळ हिंदूंचा वंशसंहार करणे, हे आहे ! |
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court