
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/997701.html
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आध्यात्मिक प्रवास
४ आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादामुळेच सर्वत्रचे अनेक जिज्ञासू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येऊ लागणे : आपण जेव्हा सर्वस्वाचा त्याग करतो, तेव्हा गुरु आणि देव आपल्याला सर्व मार्गांनी साहाय्य करतात. त्यामुळे साधना न करण्यासाठी आपण कोणतेही कारण देऊ शकत नाही. एकदा प.पू. भक्तराज महाराज यांनी मला सांगितले, ‘‘आता तुम्ही अमेरिकेला जा आणि तिथे अध्यात्मप्रसाराचे कार्य करा.’’ यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘माझ्याकडे पैसे नाहीत. मी अमेरिकेत कुणाला ओळखतही नाही.’’ यावर ते म्हणाले, ‘‘चिंता करू नका. अमेरिका तुमच्याकडे येईल.’’ हेच कारण आहे की, तुम्ही (कार्यशाळेतील जिज्ञासू) आता येथे आहात. आपण स्वतःच्या बळावर अध्यात्मप्रसाराचे किती कार्य करू शकतो ? काहीच नाही. ‘चिंता करू नका. अमेरिका तुमच्याकडे येईल’, हा प.पू. भक्तराज महाराज यांचा केवळ एक विचार, केवळ एक वाक्य असे होते की, आज त्याचे हे फलित आहे. (‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादामुळेच सर्वत्रचे अनेक जिज्ञासू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी कार्यशाळेत येतात. – संकलक)
४ इ. प.पू. भक्तराज महाराज यांनी अध्यात्माविषयी अनेक ग्रंथांचे लिखाण करण्याचा आशीर्वाद देणे आणि प्रत्यक्षातही सहस्रो ग्रंथ प्रकाशित होऊ शकतील, एवढे लिखाण संग्रही होणे : वर्ष १९९४ मध्ये एकदा प.पू. भक्तराज महाराज पलंगावर पहुडले होते. त्यांची प्रकृती ठीक नव्हती. मी त्यांच्या जवळ भूमीवर बसलो होतो. मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्हाला अध्यात्माविषयी प्रश्न विचारण्यात आता मला आनंद वाटत नाही. तुमच्या समवेत राहिल्यावर मला आनंदाची अनुभूती येते. त्यामुळे मी येथून पुढे तुम्हाला अध्यात्माविषयी शंका विचारणार नाही. केवळ तुमच्या अस्तित्वातील आनंद अनुभवत राहीन. ईश्वरही शब्दांच्या पलीकडे असतो ना ?’ हे ऐकून प.पू. भक्तराज महाराज माझ्यावर ओरडले आणि मला म्हणाले, ‘‘माझ्या गुरूंनी (अनंतानंद साईश यांनी) मला ‘तू किताबों पे किताब लिखेगा । (अध्यात्माविषयी अनेक ग्रंथांचे लिखाण करशील)’, असा आशीर्वाद दिला होता. मी केवळ भजनांचा एक ग्रंथ लिहिला. माझ्या गुरूंचा आशीर्वाद वाया जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ग्रंथांचे लिखाण करावेच लागेल.’ सध्या साडेचार सहस्र ग्रंथ प्रकाशित होऊ शकतील एवढे लिखाण टंकलेखन करून झाले आहे. हे केवळ प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादामुळेच झाले आहे. ‘हे ग्रंथ मी लिहिले आहेत’, असे मी म्हणू शकत नाही. प.पू. भक्तराज महाराज यांनी माझ्या साधनेच्या आरंभीच शक्य तितक्या सर्व प्रकारे माझा अहंकार नष्ट केला.
४ ई. ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी संतांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टाळून त्यांचे आयुष्य वाढवणे
४ ई १. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा वर्ष २००५ किंवा २००६ मध्ये असलेला महामृत्यूयोग योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या कृपेने टळणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अनेक संतांच्या कृपाशीर्वादामुळेच आज मी जिवंत आहे. माझी जन्मपत्रिका एखाद्या ज्योतिषाला दाखवली, तर ते त्वरित म्हणतील, ‘तुम्ही मला हयात नसलेल्या व्यक्तीची पत्रिका का दाखवत आहात ?’ याचे कारण वर्ष २००५ किंवा २००६ मध्येच माझा मृत्यू होणार होता. त्यानंतर मला आयुष्यच नव्हते. अनेक संतांनी अनेकदा माझे आयुष्य वाढवले आहे. ‘ते कसे ?’, हे मी सांगतो. योगतज्ञ दादाजी वैशंपायन नावाचे एक संत आहेत. त्या वेळी ते कॅनडामध्ये होते. ते इतके उच्च आध्यात्मिक पातळी असलेले संत आहेत की, त्यांना ‘भविष्यात काय घडणार आहे ?’, हे आधीच कळते. भविष्यातील घटनांच्या संदर्भात त्यांना मिळालेले ज्ञान ते एका कागदावर लिहितात आणि तो कागद एका लखोट्यात घालतात. तो लखोटा ते त्यांच्या शिष्याला पाठवतात. लखोट्यावर त्यातील पत्र उघडण्याची आणि वाचण्याची दिनांक लिहिलेली असते. ज्या दिवशी ते पत्र वाचायचे असते, त्या दिवशी एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्या कार्यक्रमाला त्यांचे १०० ते १००० शिष्य उपस्थित असतात. वर्ष २००४ मध्ये त्यांनी लिहिलेली भविष्यवाणी वर्ष २००७ मध्ये वाचायची होती. त्या पत्रात लिहिले होते, ‘वर्ष २००५ मध्ये डॉ. आठवले यांचा मृत्यू होणार आहे; परंतु मी काहीतरी करून त्यांना जिवंत ठेवेन.’ योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या शिष्याला सांगितले, ‘डॉ. आठवले यांना दूरभाष करून विचारा की, ते जिवंत आहेत कि नाहीत ?’ त्यांच्या शिष्याने दूरभाष केला. त्यांना ‘मी अजूनही जिवंत आहे’, हे आणि एका छोट्या आजाराच्या तुलनेत डॉक्टरांनी जीव वाचवणे कितीतरी महत्त्वाचे आहे, हेही समजले !
(क्रमशः)
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !