मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश
इंदूर (मध्यप्रदेश) – चीनच्या मांजावर बंदी असूनही सातत्याने जीवघेण्या घटना घडणे दुर्दैवी आहे आणि हे थांबवण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे. या मांजामुळे कुणाचा मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कलम १०६(१) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जाईल, असा आदेश मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने दिला.
Madhya Pradesh High Court sends a strong message ⚖️
Deaths caused by banned Chinese kite manjha will now be registered as culpable homicide.
Yet its open sale exposes grave failure by police & administration.
Accountability must include enforcement agencies, not just… pic.twitter.com/4sAZjz8NQn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 13, 2026
पालकांवरही गुन्हा नोंदवण्यात येणार !
उच्च न्यायालयाने म्हटले की, जर एखादी व्यक्ती चिनी मांजा विकतांना किंवा वापरतांना आढळली, तर तिच्या विरुद्ध थेट फौजदारी कारवाई केली जाईल. तसेच जर अल्पवयीन मुले चिनी मांजा वापरतांना पकडली गेली, तर त्यांच्या पालकांना उत्तरदायी धरून त्यांच्या विरुद्धही गुन्हा नोंदवला जाईल.
न्यायालयाने सांगितले की, इंदूरमध्ये गेल्या काही महिन्यांत चिनी मांजामुळे ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. याखेरीज अनेक लोक घायाळ झाले आहेत आणि मोठ्या संख्येने पक्षीही त्याच्या विळख्यात सापडून मरण पावले आहेत. १४ जानेवारीला मकरसंक्रांत आहे आणि या काळात पतंग उडवण्याचे प्रमाण वाढते. या काळात प्रतिबंधित मांजाच्या वापरामुळे मोठ्या अपघातांची शक्यता कायम रहाते.
जागरूकता मोहीम राबवत आहोत ! – मध्यप्रदेश सरकार
मध्यप्रदेश सरकारने सांगितले की, चिनी मांजावर बंदी घालण्यासमवेतच त्याच्या दुष्परिणामांविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. विक्री थांबवण्यासाठी कारवाई केली जात आहे आणि अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी विशेष उपकरणांचाही वापर केला जात आहे.
संपादकीय भूमिकाचीनच्या मांजावर बंदी असूनही तो सर्रास विकला जातो आणि त्याचा वापरही केला जातो, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे ! |

Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati