|

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (‘इस्रो’ने) ‘पी.एस्.एल्.व्ही. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन – सी ६२’ या उपग्रहाचे प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे पूर्ण होऊ शकले नाही. प्रक्षेपणानंतर तिसर्या टप्प्यात तांत्रिक बिघाड आढळून आला, ज्यामुळे उपग्रह त्याच्या इच्छित कक्षेत तैनात होऊ शकला नाही.
🚀 PSLV-C62 Mission Update
India’s rocket carrying 15 satellites veered off course, marking a setback for ISRO in its first launch of the year.
Notably, this mission saw the first major participation of Indian private space firms, a bold step despite the failure.
PC:… pic.twitter.com/A5GhrSifck
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 13, 2026
१. पीएस्एलव्ही रॉकेटद्वारे ‘अन्वेषा’ उपग्रह आणि १४ अन्य उपग्रह (७ भारतीय आणि ८ परदेशी उपग्रह) प्रक्षेपित केले जाणार होते. ‘अन्वेषा’ एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह असून त्याला पृथ्वीपासून साधारण ६०० किलोमीटरवर सूर्य-समकालिक कक्षेमध्ये तैनात करण्याचे नियोजन होते. हा एक गुप्तचर उपग्रह आहे, जो अचूक देखरेख आणि मॅपिंग यांसाठी प्रगत इमेजिंग क्षमतांनी सुसज्ज आहे. तो पृथ्वीपासून शेकडो किलोमीटर वरूनही झुडुपे, जंगले किंवा बंकर यांमध्ये लपलेल्या शत्रूंची छायाचित्रे काढू शकतो.
२. ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’द्वारे हा प्रकल्प संचालित केला जात होता. ही संस्था इस्रोची व्यावसायिक शाखा आहे. भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी ही योजना महत्त्वाची मानली जात आहे. कारण पहिल्यांदाच एखाद्या भारतीय खासगी आस्थापनाने इतका मोठा सहभाग घेतला होता.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा