
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात हिंदूंत्या हत्या होत असतांना आता प्रोलय चाकी या हिंदु गायकाला कारागृहात असतांना पुरेसे उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ११ जानेवारीला रात्री येथील राजशाही वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात चाकी यांनी अखेरचा श्वास घेतला. ते पाबना जिल्हा कारागृहात होते आणि ९ जानेवारीला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रथम त्यांना पाबना जनरल रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर राजशाही वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यांच्या कुटंबियांनी पुरेसे उपचार न मिळाल्याचा आरोप केला आहे. प्रोलय चाकी हे शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे जिल्हास्तरीय सांस्कृतिक सचिव होते. त्यांना १६ डिसेंबर २०२५ या दिवशी त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती.
🚨 Bangladesh: Hindu Singer Dies in Jail
Hindu singer Prolay Chaki died in custody due to lack of medical treatment.
He was the district Cultural Secretary of Awami League and was lodged in Pabna District Jail.
Another chilling example of the targeted persecution of Hindus in… pic.twitter.com/2khgBqxk7x
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 12, 2026
कारागृह अधीक्षकांनी आरोप फेटाळला !
पाबना जिल्हा कारागृहाचे अधीक्षक महंमद ओमर फारुक यांनी सांगितले की, प्रोलय चाकी यांना आधीपासूनच मधुमेहसह अनेक आजार होते. प्रकृती बिघडताच उपचाराची प्रक्रिया चालू करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारचा विलंब झाला नाही.
चाकी यांचे पुत्र आणि संगीत दिग्दर्शक सानी चाकी यांनी आरोप केला आहे की, जेव्हा त्यांच्या वडिलांना पाबना जनरल रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा तिथे हृदयरोगाशी संबंधित उपचारांच्या सुविधा नव्हत्या. असे असूनही त्यांना तिथेच ठेवण्यात आले, नंतर परत कारागृहात पाठवण्यात आले आणि त्यानंतर राजशाहीला नेण्यात आले, ज्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली.
गेल्या वर्षी बांगलादेशातील कारागृहात एकूण १०७ लोकांचा मृत्यू झाला !
मानवाधिकार संघटना ‘ऐन ओ सलीश केंद्र’नुसार वर्ष २०२५ मध्ये बांगलादेशातील कारागृहांमध्ये एकूण १०७ लोकांचा मृत्यू झाला, ज्यांत ६९ विचाराधीन बंदीवान आणि ३८ शिक्षा झालेले बंदीवान यांचा समावेश होता. वर्ष २०२४ मध्ये कोठडीतील मृत्यूंची संख्या ६५ नोंदवली गेली होती.
संपादकीय भूमिकाकोणत्याही प्रकारे हिंदूंना ठार मारण्याचा एककलमी कार्यक्रम बांगलादेशात चालू आहे, त्याचेच हे एक उदाहरण ! |
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका