
सावंतवाडी – येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर घालण्यात आलेल्या टाक्यांमुळे काही महिलांना त्रास झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्याची चर्चा शहरात चालू आहे. यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रुग्णालयांमध्ये शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार्या साहित्याचाच वापर केला जातो. काही वेळा टाक्यांचा दोरा दर्जेदार नसल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांना पूर्वकल्पना देऊन आवश्यक साहित्य बाहेरून आणण्यास सांगितल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात नेमकी चूक कुठे झाली ? टाक्यांचा दर्जा निकृष्ट होता का ? पुरवठा प्रक्रियेत काही त्रुटी होत्या का ? याची सखोल चौकशी शासन स्तरावर होणे आवश्यक असल्याची मागणी आता केली जात आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचा गैरकारभार उघड करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

सावंतवाडी – उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर गैरप्रकार आणि प्रशासनाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर येऊ नये, म्हणूनच प्रामाणिक अन् निःस्वार्थपणे सेवा देणार्या सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करून त्यांना रुग्णालयापासून दूर ठेवण्याचे मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. रुग्णालयातील ढिसाळ कारभार, रुग्णांची होणारी हेळसांड आणि विनाकारण खासगी रुग्णालयात रुग्णांना पाठवण्यामागचे गौडबंगाल या सर्व गोष्टींची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांकडे असल्यामुळेच त्यांना पद्धतशीरपणे अपकीर्त केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवि जाधव यांनी केला आहे.
एका प्रकरणात रुग्णालयात गेलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला ‘रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती यांनी यायची आवश्यकता नाही. तुमच्यामुळे कर्मचार्यांवर दबाव रहातो आणि चुका होतात’, अशा शब्दांत कर्मचार्यांच्या संघटनेच्या नेत्याने दमदाटी केली. त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात काम बंद आंदोलनाची धमकी दिली. रुग्णालयात उपचार घेणार्या गोरगरीब रुग्णांचे हाल होऊ नयेत; म्हणून संबंधित सामाजिक कार्यकर्त्याने क्षमा मागून वाद मिटवला, असे जाधव यांनी सांगितले.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !