|

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी सैन्याला रूपरेषा सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. त्यांनी विशेष दलांच्या प्रमुखांना संभाव्य सैनिकी कारवाईसाठी सिद्ध रहाण्यास सांगितले आहे. तथापि सैन्यातील वरिष्ठ अधिकार्यांनी यास उघड विरोध दर्शवला आहे. ‘हा निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असून अमेरिकी काँग्रेसही त्याला पाठिंबा देणार नाही’, असे मत सैन्यप्रमुखांनी व्यक्त केले आहे.
अमरिकी सैन्यातील एका गटाचे स्पष्ट मत आहे की, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना हटवल्यानंतर आता ग्रीनलँडवरही अमेरिकेने वेगाने पावले उचलायला हवीत. अन्यथा रशिया किंवा चीन तेथे त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करतील.
ब्रिटीश प्रशासकीय अधिकार्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या ग्रीनलँडच्या संदर्भातील भूमिकेच्या पाठीशी तेथील अंतर्गत राजकारण कारणीभूत आहे. लवकरच होणार्या मध्यावधी निवडणुकांकडे पहाता जनता सरकारकडे अर्थव्यवस्थेवरून जाब विचारू शकते. यामुळे सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या मोठ्या सूत्राकडे मतदारांचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे.
ग्रीनलँडचे भविष्य तेथील लोक स्वतः ठरवतील ! – ग्रीनलँडचे राजकीय पक्ष
दुसरीकडे ग्रीनलँडमधील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी संयुक्त निवेदन प्रसारित करून स्पष्ट केले की, त्यांना ना अमेरिकी व्हायचे आहे आणि ना डेन्मार्कच्या अधिपत्याखाली रहायचे आहे. ग्रीनलँडचे भविष्य तेथील लोक स्वतः ठरवतील.
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता
Lawrence Bishnoi Extradition : अमेरिका भारताच्या कारागृहात असणारा गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रत्यार्पणाची मागणी करणार
अमेरिकेकडून इराणच्या १४० सैन्य ठिकाणांवर आक्रमणे