
न्यूयॉर्क – अमेरिकेने ११ जुलैच्या रात्री उशिरा इराणवर मोठ्या प्रमाणात हवाई आक्रमण केले. अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने दिलेल्या माहितीनुसार यात इराणच्या अनुमाने १४० सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये (२ जलाशयांना जोडणार्या जलमार्गामध्ये) सायप्रसचा ध्वज असलेल्या एका नौकेवर झालेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. त्या आक्रमणामुळे नौकेला आग लागली, त्याचे इंजिन निकामी झाले आणि त्यावरील एक कर्मचारी बेपत्ता झाला.
१. अमेरिकेच्या या हवाई आक्रमणानंतर काही वेळातच इराणी सैन्यानेही प्रत्युत्तर म्हणून कुवेत आणि बहरीन येथील अमेरिकी सैन्य तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण केल्याची माहिती दिली.
२. इराणने म्हटले आहे की, कुवेतमधील अमेरिकेची ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण यंत्रणा, दारूगोळ्याची गोदामे आणि रडार केंद्रे, तसेच बहरीनमधील अमेरिकेची दळणवळण यंत्रणा आणि रडार केंद्रे यांना लक्ष्य करण्यात आले. तथापि अमेरिका, कुवेत किंवा बहरीन यांच्याकडून या आक्रमणांविषयी कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
इराणने अणूस्थळांची पुनर्बांधणी चालू केल्याचा ‘सी.एन्.एन्.’ वृत्तवाहिनीचा दावा
उपग्रह चित्रीकरणाचा आधार घेत ‘सी.एन्.एन्.’ या वृत्तवाहिनीने दावा केला की, इराण ‘पारचिन’सह काही अणूस्थळांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करत आहे. या वृत्तात इराणच्या या कृतीला अमेरिका आणि इराण यांच्यातील सामंजस्य कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले जात आहे.
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता
Kenya Halal certification : केनियामध्ये हलाल प्रमाणपत्रांच्या विरोधात व्यापार्यांची न्यायालयात याचिका
नेपाळमधील तरुण पुन्हा रस्त्यावर : बेरोजगारीच्या विरोधात संताप !
France 24 Media : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवून मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे !’
Lawrence Bishnoi Extradition : अमेरिका भारताच्या कारागृहात असणारा गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रत्यार्पणाची मागणी करणार