(प्रत्यार्पण म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला एका देशाकडून दुसर्या देशाच्या स्वाधीन करण्याची कायदेशीर प्रक्रिया)

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचा न्याय विभाग भारतातील कारागृहात असणारा गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रत्यार्पणाची भारताकडे मागणी करणार आहे. वर्ष २०१४ पासून तो गुजरातमधील कारागृहात आहे. कॅनडातील खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येसह इतर अनेक गुन्ह्यांमध्ये लॉरेन्स बिश्नोई याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
The U.S. is reportedly preparing to seek the extradition of jailed gangster Lawrence Bishnoi from India over allegations linked to the Hardeep Singh Nijjar case and other crimes.
If the U.S. can seek extradition from India, why isn't India demanding the extradition of Khalistani… https://t.co/tHEIADSHOp pic.twitter.com/9Il5Fym7kF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 12, 2026
न्याय विभागाने काही दिवसांपूर्वीच ‘ऑपरेशन हार्डबॉल’ अंतर्गत दोषारोपपत्रात ३७ जणांवर गुन्हे प्रविष्ट केले होते. अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील कायदा अंमलबजावणी संस्था यांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत ३ भारतीय गुन्हेगारी टोळीशी संबंधित २४ जणांना अटक करण्यात आली. बिश्नोई आणि त्याचा साथीदार गोल्डी ब्रार यांच्यासह अमेरिकेच्या दोषारोपपत्रात नाव असलेल्या इतर टोळी प्रमुखांमध्ये आसामच्या कारागृहात असलेला जग्गू भगवानपुरिया आणि कॅनडातील रहिवासी रवींदरसिंह धांडा यांचा समावेश आहे. बिश्नोई आणि ब्रार यांच्यावर निज्जरच्या हत्येचा आदेश दिल्याचा आरोप आहे. अमेरिकेने ब्रारचा ठावठिकाणा सांगणार्याला ५० सहस्र डॉलर्सचे (४७ लाख ६६ सहस्र ५२५ रुपये) बक्षीस घोषित केले आहे.
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता
Kenya Halal certification : केनियामध्ये हलाल प्रमाणपत्रांच्या विरोधात व्यापार्यांची न्यायालयात याचिका
नेपाळमधील तरुण पुन्हा रस्त्यावर : बेरोजगारीच्या विरोधात संताप !
France 24 Media : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवून मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे !’
अमेरिकेकडून इराणच्या १४० सैन्य ठिकाणांवर आक्रमणे
हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !