अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन
‘स्क्रीनटाइम’ वाढणे, हा युवकांच्या आरोग्यासाठी गंभीर आव्हान असल्याची चर्चा !
(‘स्क्रीन टाइम’ वाढणे म्हणजे भ्रमणभाष, संगणक, दूरदर्शन, टॅब्लेट यांसारख्या डिजिटल उपकरणांवर घालवला जाणारा वेळ वाढणे)

नाशिक, ११ जानेवारी (वार्ता.) : भ्रमणभाष, संगणक, दूरदर्शन, टॅबलेट आदी डिजिटल साधनांवर घालवला जाणारा वाढता ‘स्क्रीनटाइम’ हा युवकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांसाठी गंभीर आव्हान ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून ‘स्क्रीन टाइम टू ॲक्टिव्हिटी टाइम’ म्हणजेच आभासी जगातून बाहेर येऊन प्रत्यक्ष कृतीशील जीवनशैली अंगीकारणे अत्यावश्यक आहे, असा ठराव अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आला. ही माहिती सांगली येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, सांगली महानगर अध्यक्ष डॉ. सिद्धेश्वर जाधव, महानगर मंत्री अवनीश यादवाडे उपस्थित होते. या अधिवेशनाला राज्यभरातून एकूण ७७६ प्रतिनिधी उपस्थित होते.
अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रांत का 60वाँ प्रांत अधिवेशन परम पूज्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज, पीठाधीश्वर श्री देवनाथ मठ (अंजनगाँव सुर्जी), महाराष्ट्र सरकार के जलसंसाधन मंत्री माननीय श्री @girishdmahajan, राष्ट्रीय सह-संगठन मंत्री श्री @jdevdatt, pic.twitter.com/XNf7hcou6b
— ABVP (@ABVPVoice) January 7, 2026
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की,
१. अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे ६० वे ‘हिरक महोत्सवी’ अधिवेशन नाशिक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, डोंगरे वसतीगृह मैदान येथे ३ ते ५ जानेवारी या कालावधीत उत्साहात पार पडले.
२. अधिवेशनात युवकांच्या आरोग्यासमवेतच शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
३. राज्यातील विविध विद्यापिठांनी घेतलेला ‘कॅरी ऑन’चा (अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश मिळण्याची सोय होणे) निर्णय, तसेच शैक्षणिक वेळापत्रकातील अनियमितता, यांचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दूरगामी आणि नकारात्मक परिणाम होतात, याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली.
४. ‘नाशिकच्या कुंभनगरीत शाश्वत विकास व्हावा’, अशी मागणी करणारा ठरावही अधिवेशनात संमत करण्यात आला.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !