राज ठाकरे यांनी तत्त्वहीन राजकारणाचा ठपका ठेवला हिंदूंच्या देवतांवर !

मुंबई – सध्या महाराष्ट्र आणि देशात ज्या प्रकारचे राजकारण चालू आहे, ते पहाता मला खरच प्रश्न पडतो की, देवीदेवता आहेत का ? आणि आहेत, तर ते केवळ हे पहात का बसले आहेत ? अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्त्वहीन राजकारणाविषयी हिंदूंच्या देवतांना उत्तरदायी ठरवले. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ‘आणि एवढे देव ३३ कोटी’, असे म्हणत राज ठाकरे यांच्या बोलण्याला दुजोरा दिला.
खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे अन् उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत २ दिवसांपूर्वी प्रसारित करण्यात आली आहे. या मुलाखतीमधील एका प्रश्नावर उत्तर देतांना राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी वरील वक्तव्य केले. या त्यांच्या वक्तव्यावरून सामाजिक माध्यमांवरून राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा